RSS वर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीमुळे जावेद अख्तर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स

RSS वर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीमुळे जावेद अख्तर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स

गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स पाठवला आहे. जावेद अख्तर यांना हा समन्स मुंबईच्या मुलुंड मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट न्यायालयाने पाठवला आहे. खरंतर हा समन्स एका वकीलाकडून पाठवण्यात आला आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जावेद अख्तर यांनी वादग्रस्त टिपण्णी केल्याबद्दल करण्यात आली. ज्यानंतर कोर्टाने मंगळवारी हा समन्स जारी केला. जावेद अख्तर यांनी ही मुलाखत मागच्या वर्षी दिली होती. या वकीलाने जावेद अख्तर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत कोर्टामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मुलाखतीत काय म्हणाले जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी सप्टेंबर 2021 मध्ये एका मुलाखतीमध्ये आरएसएस आणि तालिबानची तुलना केली होती. ते म्हणाले होते की,. आरएसएसटला पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता तालिबान्यांसारखी आहे. पाठिंबा देणाऱ्यांना आत्मपरिक्षण करायला हवे की तुम्ही ज्या लोकांना पाठिंबा देत आहात. त्यांच्यामध्ये आणि तालिबान्यांमध्ये काय अंतर आहे याबद्दल विचार करायला हवा.

संघटनेची बदनामी करण्याचा आरोप
जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्याने असा दावा केला आहे की, राजकीय फायद्यासाठी जावेद अख्तर यांनी विणाकारण आरएसएसचे नाव वादात ओढले आहे. वकीलांनी सांगितले की, मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी आरएसएसला बदनाम करण्यासोबतच या संघटनेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

6 फेब्रुवारी असणारी पुढील सुनावणी
हा वाद समजल्यानंतर मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट पीके राऊत यांनी जावेद अख्तर यांना समन्स जारी केला आहे. या प्रकरणांची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावं लागेल.

 


हेही वाचा :

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटप्रकरणी मिळाला दिलासा

First Published on: December 14, 2022 9:19 AM
Exit mobile version