‘बॉईज २’ ध ध धमाल

‘बॉईज २’ ध ध धमाल

boys 2

चित्रपट आणि त्यांचा सिक्वेन्स हे बर्‍याच वेळा परदेशातच होत होते. पण आता हिंदी चित्रपटाने सिक्वेन्सचा सपाटा लावला आहे. गोलमाल ४ भागांपर्यंत आला. रोहित शेट्टीला वाटले तर तो आणखीनही काही भाग करेल सुद्धा. ज्या गोष्टीला हिंदीत प्राधान्य दिले जाते त्याचे अनुकरण मराठी चित्रपटसृष्टी करीत असते. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाने ३ भागांपर्यंत चित्रपटनिर्मिती केली. आता ४ थ्या भागाचीही तयारी करतील. अवधूत गुप्ते सादर करत असलेल्या ‘बॉईज’ या चित्रपटाने ‘बॉईज २’ च्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक मिळवला होता. हा ‘बॉईज २’ वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर म्हणून सोनी मराठीवर रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे.

इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अवधुत गुप्ते प्रस्तुत, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित ‘बॉईज २’ सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. यंग बॉईजसह शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत. याशिवाय पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमन शिंदे यांचा मुख्य भूमिकेत सहभाग असणार आहे.

First Published on: February 22, 2019 4:47 AM
Exit mobile version