2022 मध्ये सर्वाधिक सर्च झाला ‘ब्रह्मास्त्र’, यादीत टॉलिवूडच्या 5 चित्रपटांचाही समावेश

2022 मधील डिसेंबर महिना सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात नव्या वर्षाची सुरुवात होईल. अशातच आता या वर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या नावाची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये गेल्या 11 महिन्यांचा डाटा जारी करण्यात येतो असून या काळात भारतामध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या यादीमध्ये प्रथम क्रमांक बॉलिवूडमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने पटकावला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 2022 मधील गूगल सर्च यादीत पहिल्या स्थानी होता. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘केजीएफ 2’ आहे तर तिसऱ्या क्रमांकावर बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे नाव आहे.

‘RRR’ चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर ‘कांतारा’ने पाचवा क्रमांक पटकावला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाने सहावा क्रमांक पटकावला असून ‘विक्रम’ चित्रपटाने सातवे स्थाने पटकावले. आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ने या चित्रपटामध्ये आठवे स्थान पटकावले तर ‘दृश्यम 2’ चे नाव नवव्या स्थानी आहे. तसेच ‘थोर : द लव अॅण्ड थंडर’ या हॉलिवूड चित्रपटाने दहावे स्थान पटकावले आहे.

2022 मध्ये भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या या चित्रपटामध्ये 4 चित्रपट बॉलिवूडमधील असून 5 पाच टॉलिवूडमधील आहेत आणि 1 चित्रपट हॉलिवूडमधील आहे. गूगल सर्च यादीतील सर्वच चित्रपट भारतात प्रचंड चर्चेत होते. यांपैकी अनेक चित्रपटांनी करोडोंची कमाई केली तर काही चित्रपटांना भारतात विरोध देखील करण्यात आला.

 


हेही वाचा :

‘ईयर इन सर्च 2022’ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून, सुष्मिता सेनपर्यंत ‘या’ व्यक्तींचा समावेश

First Published on: December 8, 2022 10:39 AM
Exit mobile version