पब्लिकमध्ये breastfeeding करणे काय चुकीचे, अभिनेत्री म्हणाली…

पब्लिकमध्ये breastfeeding करणे काय चुकीचे, अभिनेत्री म्हणाली…

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा मर्दा सध्या आईपणाचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिलायं. अशातच तिने ब्रेस्टफिडिंग करण्याबद्दल भाष्य केलेयं. नेहा मर्दाने एका मुलाखतीत असे म्हटले होते की, सार्वजिक ठिकाणी ब्रेस्टफिडिंग करणे तिला काही समस्या नाही. यामध्ये लाजण्यासारखे काय असे ही म्हटले.

नेहाने पुढे असे म्हटले की, मी नेहमीच आपल्या बाळाला घरीच दुध पाजून बाहेर घेऊन जाईल. मात्र जर त्याला बाहेर जाऊन भूक लागली तर तिला उपाशी ठेवणार नाही. त्याला फीड करण्याचे पर्याय शोधून काढेन. मुलाला पब्लिकली फीड करणे काही चुकीचे नाही. तुम्ही केवळ त्यावेळी तुमच्या मुलाचे पोट भरत असता. ही सर्वसाधारण बाब आहे.

नेहाने मुलाखतीत एका आई असणे आणि तिच्या आरोग्यासंबंधित सुद्धा प्रश्न उपस्थितीत केले. तिने असे म्हटले की, बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेच्या शरिराला रिकवर होण्यासाठी खुप वेळ लागतो. ती अशी म्हणते की, जर आम्ही ९ महिने बाळ पोटाच ठेवतो तर रिकवर होण्यासाठी सुद्धा ९ महिने तरी एका महिलेला हवेच ना.

पुढे तिने असे म्हटले की, मी मुलाला जोपर्यंत ब्रेस्टफिडिंग करत आहे तो पर्यंत माझे वजन कमी करण्यासाठी कोणतेही क्रॅश डाएट करणार नाहीयं. सध्या नेहा आईपणाचा आनंद घेत आहे. यामधून तिला फार आनंद मिळतोय असे ही ती म्हणाली.

नेदा मर्दाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘बालिका वधू’ , ‘डोली अरमानो की’ आणि ‘क्यो रिश्तो की कट्टी बट्टी’ सारख्या मोठ्या शो मध्ये काम केलेयं.


हेही वाचा- TMKOC : “फीमेल को-स्टार देखील माझी साथ देत नाहीत”, जेनिफर मिस्त्रींची खंत

First Published on: May 20, 2023 3:16 PM
Exit mobile version