ब्रिटनी स्पीयर्सला वडिलांच्या पालकत्वातून मुक्ती, केला न्यूड होऊन जल्लोष

ब्रिटनी स्पीयर्सला वडिलांच्या पालकत्वातून मुक्ती, केला न्यूड होऊन जल्लोष

ब्रिटनी स्पीयर्सला वडिलांच्या पालकत्वातून मुक्ती, केला न्यूड होऊन जल्लोष

अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सने बऱ्याच काळापासून वडील जेमी स्पीयर्स यांच्या पालकत्वापासून मुक्तता मिळण्याची लढाई लढत होती. आता यामध्ये ती जिंकली आहे. अखेर ब्रिटनी स्पीयर्सला आपले वडील जेमी स्पीयर्सच्या पालकत्वापासून मुक्तता मिळाली आहे. २००८ पासून ब्रिटनी आपल्या आर्थिक आणि मानसिक निर्णयांसाठी वडील जेमी यांच्यावर अवलंबून होती. म्हणजेच पॉप स्टारचे सर्व निर्णय तिचे वडील घेत होते. परंतु आता पालकत्वापासून मुक्तता मिळल्यानंतर पॉप स्टारने असा काही जल्लोष केला आहे, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

ब्रिटनी स्पीयर्सने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती न्यूड होऊन पोज देत आहे. हे फोटो शेअर करत ब्रिटनीने लिहिले की, ‘प्रशांतमध्ये खेळल्यामुळे कधी कोणाला जखम झाली नाही. फोटो एडिट केले नाही आहेत. टब कव्हर आहे.’ ब्रिटनी स्पीयर्सच्या या पोस्टवर तिच्या बॉयफ्रेंड सॅम असगरीने प्रतिक्रिया दिली आहे. तर इतर युजर देखील पॉप स्टारच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

नुकताच ब्रिटनी स्पीयर्सने बॉयफ्रेंड सॅमसोबत एक वर्कआउट करताना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने लिहिले की, ‘मी नेहमी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत व्यायामासाठी वेळ काढते. तो माझ्या मुलांसारखा मजबूत आहे.’ दरम्यान बुधवारी लॉस एंजेलिसच्या सर्वोच्च न्यायालयात ब्रिटनी स्पीयर्सच्या पालकत्वाबाबत सुनावणी पार पडली.


हेही वाचा – सामंथा नागा चैतन्यामध्ये अखेर घटस्फोट, सोशल मीडियावर केले जाहीर


First Published on: October 2, 2021 6:57 PM
Exit mobile version