Cannes2021: ‘या’ महिला दिग्दर्शकाने पटकावला कान्स मधील मानाचा palme d’or गोल्डन पाम अवॉर्ड

Cannes2021: ‘या’ महिला दिग्दर्शकाने पटकावला कान्स मधील मानाचा palme d’or गोल्डन पाम अवॉर्ड

Cannes2021: 'या' महिला दिग्दर्शकाने पटकावला कान्स मधील मानाचा palme d'or गोल्डन पाम अवॉर्ड

फ्रांन्समधील ग्रँड थिएटर लुमियरमध्ये आयोजित 74 व्या कान्स फिल्म फेस्टिवल 2021 ला सुरुवात झाली आहे. आता पुन्हा एकदा या फेस्टिवलमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तब्बल 28 वर्षांनी यंदा कान्सचा प्रतिष्ठित अवॉर्ड Palme d’or ज्याला गोल्डन पाम असे देखील संबोधले जाते हा मानाचा पुरस्कार फ्रांन्सीस महिला फिल्म दिग्दर्शक जुलिया (Julia Ducournau) यांना देण्यात आला आहे. जुलिया गोल्डन पाम अवॉर्डने सन्मानित होणारी दुसरी महिला दिग्दर्शक ठरली आहे. 38 वर्षीय जूलिया एक फ्रांन्सीस डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर आहे. ‘टायटन’ सिनेमा आधी जुलियाचा ‘रॉ’ सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. जुलियाने आत्तापर्यंत बॉडी हॉरर सारखे जॉनर मधील सिनेमाचं दिग्दर्शित केले आहेत. जुलियाला हा गोल्डन पाम अवॉर्ड तिच्या ‘टायटन’ फिल्मसाठी देण्यात आला आहे.(Cannes 2021: this female director wins prestigious Palme d’or Golden Palm Award in Cannes)

या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर कान्समध्ये 13 जुलै रोजी करण्यात आला होता. टायटन सिनेमात हिंसा आणि शारीरिक संबंध यावर भाष्य करण्यात आला आहे. हा सिनेमा एका अशा दु:खी मुलीवर चित्रित करण्यात आला आहे जी लहानपणी रस्तयावर घडलेल्या एका दुर्घटनेमध्ये यौन विकृतीचा शिकार होते. सिनेमात अगाथा रोसेल, विन्सेंट लिंडन, गारांस मैरीलिएर यांच्या मुख्य भूमिका आहे शनिवारी कान्स फेस्टिवलमध्ये या बहुप्रतिष्ठित आवॉर्डची घोषणा करण्यात आली.


हे हि वाचा –‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा फर्स्ट लुक आला समोर!

First Published on: July 19, 2021 2:40 PM
Exit mobile version