शामक दावरने साजरा केला दिव्यांगांसोबत विशेष नृत्य उत्सव

शामक दावरने साजरा केला दिव्यांगांसोबत विशेष नृत्य उत्सव

नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांनी दिव्यांग मुलांना नृत्य शिकवले

बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांनी दिव्यांग मुलांसाठी नृत्य उत्सवाचे आयोजन केले होते. या माध्यमातून त्यांनी विशेष मुलांना नृत्य सादर करण्याची संधी दिली. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली, शामक दावर यांच्या ना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेने दिव्यांग मुलांना यातून निखळ आनंद मिळवून दिला तसेच प्रत्येकजण नाचू शकतो हे सर्वांचा दाखवून दिले. २००४ साली सामाजिक समस्या आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी शामक दावर यांनी व्हिक्टरी आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. व्हिक्टरी आर्ट वय, लिंग आणि जात-पात या सर्वांसाठी कोणताही पूर्वग्रह न ठेवता नृत्य करण्यास संधी देते. व्हिक्टरी आर्ट नृत्य शक्तीचा उपयोग करून वंचित, शारीरिकरित्या, मानसिकरित्या आव्हानात्मक, दृष्टिहीन आणि मूक-बधिर मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा तसेच नाचण्यायोग्य बनवून करियर पर्याय ही तयार करते.

जेव्हा मी माझी डान्स अकादमी सुरू केली, त्यावेळी विशेष गरजा असलेल्या मुलांचे फार थोडे पालक त्यांना वर्गांमध्ये पाठवू शकले. जवळ-जवळ पंचवीस-तीस वर्षांपूर्वी, पोलिओ असलेली एक मुलगी वर्गास उपस्थित राहिली. एक वर्षानंतर, तिने मला सांगितले की ती खरोखरच आपल्या हाताला हलवू शकते. प्रथम मला समजले नाही, परंतु कालांतराने मला हे जाणवले की त्यांच्यामध्ये नृत्य करण्याची क्षमता आहे. तेव्हाच मी व्हिक्टरी आर्ट फाउंडेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अधिक लोकांना नाचण्यास प्रोत्साहित केले जाईल. ‘पाय आहेत, तर नाचू शकाल’ च्या उद्दिष्टासह इच्छा आहे तर, विजय मिळवाल.
– शामक दावर, नृत्य दिग्दर्शक

मुलांसाठी डान्स थेरेपीच

दरवर्षी या संस्थेच्यावतीने एक सादरीकरण ठेवले जाते, जिथे व्हिक्टरी डान्स टीम, व्हिक्टरी ऑन व्हील्स आणि सहभागी एनजीओ स्टेजवर सादरीकरण करतात. व्हिक्टरी नृत्य थैरेपी म्हणून नृत्य लागू करते आणि विविध स्वयंसेवी संस्थांना नृत्य शिकवते. एनजीओ कार्यक्रमांमधील डान्स क्लासेस डान्स थेरपीची वैशिष्ट्ये हि कि सेरेब्रल पाल्सी, ऑटिस्टिक आणि मानसिक मंद असलेल्या व्यक्तीं, व्हीलचेयर बाउंडसारख्या शारीरिक अपंगांसाठी, क्रॅच / कॅलिपरवर, ब्लाइंड, श्रमिक, अनाथ, बाल मजूर ज्येष्ठ नागरिक, मानवी तस्करीचे बळी, घरगुती हिंसा बळी असलेल्या स्त्रियांना भावनिकरित्या दुखावले गेलेली मुले, कर्करोग, स्किझोफ्रेनिया आणि एचआयव्हीसारख्या आजारपणामुळे किंवा रोगाने प्रभावित झालेल्या विशेष गरज असलेल्या मुलांना ही डान्स थेरपी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणते.

First Published on: November 28, 2018 6:54 PM
Exit mobile version