CID फेम दयाचं मराठीत पदार्पण, ‘गरम किटली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

CID फेम दयाचं मराठीत पदार्पण, ‘गरम किटली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

CID फेम दयाचं मराठीत पदार्पण, 'गरम किटली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘दया दरवाजा तोड दो’ हा डायलॉग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे आणि ढाई किलोच्या हाताने भिंत तोडणारा दया देखील सर्वांच्या लक्षात असेल. सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांच्यासोबत दया हे पात्र देखील तितकेच गाजले. दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी (dayanand shetty ) हा आता मराठी सिनेमात दिसणार आहे. गरम किटली या सिनेमातून दया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. गरम किटली या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या सिनेमात दया एक प्रमुख भूमिका साकारणार असून ही भूमिका कशी असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अभिनेता दयाने आतापर्यंत अनेक क्राईम मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. दया एक उत्तम थिएटर्स आर्टिस्ट देखील आहे. दयाला याआधी सिक्रेट या तुळू भाषेतील नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. परंतु सीआडी मालिकेतील दया या भूमिकेमुळे दया देशातील घराघरापर्यंत पोहोचला. सीआयडी मालिकेतील दयाचे डायलॉग विशेष प्रसिद्ध झाले आहे. ‘जब दया का हाथ पडता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है… हा त्याचा डायलॉग विशेष गाजला. आता मराठी सिनेमात दया काय धुमाकूळ घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गमर किटली या सिनेमाची निर्मिती गणेश रॉक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. तर चित्रसेन नाहक आणि राजेश हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. तर राज पैठणकर यांनी सिनेमाचे लेखन, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे.


हेही वाचा – महिला कला महोत्सवात ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ हाऊसफुल्ल

First Published on: March 9, 2022 7:47 PM
Exit mobile version