अक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल; भारताच्या नकाशावर चालणं पडलं महागात

अक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल; भारताच्या नकाशावर चालणं पडलं महागात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. विविध चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून अक्षयला विविध कारणांमुळे सतत ट्रोल केलं जातं. याचं कारणामुळे 2022 मधील अक्षयचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अक्षयने नॉर्थ अमेरिकेच्या टूर प्रमोशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात त्याने पृथ्वीवर चालताना भारताच्या नकाशावर पाय दिला होता. हे पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. अशातच आता अक्षयवर गृहमंत्रालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा :

विराट आणि जडेजाच्या डान्सवर शाहरुख म्हणतो; माझ्यापेक्षा…

First Published on: February 15, 2023 11:00 AM
Exit mobile version