अवघ्या दोन दिवसात ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरातून केला 200 कोटींचा टप्पा पार

अवघ्या दोन दिवसात ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरातून केला 200 कोटींचा टप्पा पार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकजून विरोध केला जात होता. दरम्यान, आता पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘पठाण’ने दुसरऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 52.20 करोडोंची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. दोन दिवसात या चित्रपटाने 127 कोटी कमावले आहेत. तर जगभरातून या चित्रपटाने 235 कोटी कमावले आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने देखील लाखो तिकीटांची विक्री केली होती. पहिल्या दोन दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल
भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.


हेही वाचा :

काश्मिरमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ने तोडला 32 वर्षांचा रेकॉर्ड; चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड

First Published on: January 27, 2023 3:05 PM
Exit mobile version