Coronavirus: ‘बॉलिवूड स्टार बजावताय महत्त्वाची भूमिका’; पंतप्रधनांनी केलं कौतुक

Coronavirus: ‘बॉलिवूड स्टार बजावताय महत्त्वाची भूमिका’; पंतप्रधनांनी केलं कौतुक

'बॉलिवूड स्टार बजावताय महत्त्वाची भूमिका'; पंतप्रधनांनी केलं कौतुक

कोरोना व्हायरस सारख्या भयावह युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासन, नागरिकांसह बॉलिवूड कलाकार देखील कुठे मागे नाहीत. बॉलिवूड कलाकारांचा हा सहभाग बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बॉलिवूड स्टार्सचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कौतुक करतांना त्यांनी असे म्हटले की, नागरिकांमध्ये जनजागृती करणे असो किंवा पीएम केयर्स निधीसाठी लागणारे सहकार्य करण्यात कलाकार मुख्य भूमिका बजावत आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सामान्य माणसांचे, हातवर पोट असणाऱ्यांचे जनजीवन पूर्णतः थांबले आहे. विशेषतः मजूर, कष्टकरी वर्गातील लोकांसाठी मदत आणि सहकार्य मिळावे म्हणून पंतप्रधानांनी पीएम केयर्स अशा नावाची निधी सुरू केली असून बॉलिवूड कलाकारांनी जास्तीत जास्त आर्थिक मदत केली आहे. यामध्ये सर्वात प्रथम बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारने २५ कोटी देत आर्थिक मदत केली, या केलेल्या मदतीचे मोदींनी त्याच दिवशी आभारही मानले.

यानंतर कार्तिक आर्यन याने १ कोटी, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २१ लाख तसेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ५० लाख रूपये पीएम केयर्स निधीसाठी देण्याचे जाहीर केले. अजय देवगनने आपल्या फ़िल्म कंपनी अजय देवगन फ़िल्म्सतर्फे पीएम केयर्स निधीसाठी १.१ कोटी रूपये देण्याचे घोषित केले. या सर्व कलाकारांचे आभार मानताना पंतप्रधानांनी ट्विट करत असे लिहिले की, भारताचे कलाकार देशाची स्थिती चांगली व्हावी यासाठी महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

या कलाकारांसह पंतप्रधान मोदींनी रॅपर बादशाह, रणवीर शौरी आणि गुरु रंधावा यांचे देखील आभार मानले आहे. याशिवाय पीएम केयर्समध्ये वरुण धवन, विक्की कौशल, राजकुमार राव, रणदीप हुड्डा, मनीष पॉल, सारा अली ख़ान, अनुष्का शर्मा, कृति सनोनसह अनेक कलाकारांनी देखील आपले योगदान दिले आहे.

First Published on: April 1, 2020 10:53 AM
Exit mobile version