Corona: वैद्यकीय स्टाफसाठी अभिनेता सोनू सूदने उघडले आपल्या हॉटेलचे दरवाजे!

Corona: वैद्यकीय स्टाफसाठी अभिनेता सोनू सूदने उघडले आपल्या हॉटेलचे दरवाजे!

द्यकीय स्टाफसाठी अभिनेता सोनी सूदने उघडले आपल्या हॉटेलचे दरवाजे!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मंडळी कोरोना युद्धाविरूद्ध लढण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहे. यामध्ये बॉलिवूडकरांनी देखील आपला मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने गुरूवारी मुंबईतील जुहू येथे असणारे त्याचे हॉटेल वैद्यकीय कर्मचारी, स्टाफ करता उपलब्ध करून दिले आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेता सोनूने असा खुलासा केला की, ‘कोरोना व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, स्टाफ, डॉक्टरांना त्यांच्याच बिल्डींगमध्येच प्रवेश दिला जात नाही, तसेच त्यांच्यासोबत गैर वर्तवणूक केली जात आहे. म्हणून मी त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.’

एका वृ्त्तवाहिनीशी बोलताना त्याने असे देखील सांगितले की, ‘कोरोना रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर रोज आपल्या परिवारापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. तसेच रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत आहे. अशावेळी समाजाचे आपणही काहीतरी देणं लागतो याकरता मी माझ्या हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्याने त्यांचा रोजचा प्रवास कमी होऊन ते सुरक्षित राहू शकतील.’ अशा परिस्थितीत मुंबईत अनेक रूग्णालये आहेत. याठिकाणी काम करणारे डॉक्टर्स, स्टाफ त्यांच्यासाठी हॉटेल शक्ती सागर मध्ये राहण्याची उत्तम सोय असून तुम्ही येऊ शकतात, असे त्याने सांगितले आहे.


रामायणातील ‘सुग्रीव’ साकारणाऱ्या श्याम सुंदर कलानी यांचे निधन
First Published on: April 10, 2020 12:09 AM
Exit mobile version