‘रात्रीस खेळ चाले’ – या अभिनेत्रीचा नवरा आहे पोलिसात, कोरोनाकाळात करतोय ड्युटी!

‘रात्रीस खेळ चाले’ – या अभिनेत्रीचा नवरा आहे पोलिसात, कोरोनाकाळात करतोय ड्युटी!

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या पर्वावर देखील पहिल्या पर्वाप्रमाणेच प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे सर्व कलाकार घरीच आहेत.

कठीण परिस्थितीत स्वतःचा विचार न करता पोलीस बांधव मात्र अहोरात्र काम करून आपली सेवा करत आहेत. अशातच पोलिसांना मारहाण झालेल्या काही घटना पुढे आल्या. वच्छी म्हणजेच संजीवनी पाटील यांचे पती पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलिसाची पत्नी या नात्याने संजीवनी या घटनांवर व्यक्त झाली.

याबद्दल बोलताना संजीवनी म्हणाली, “कठीण व अडचणीच्या प्रसंगात पोलीस खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आपण या कोरोना पासून वाचण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी घरीच थांबलं पाहिजे. सरकारी आदेशांचे पालन केलं नाही तर याहून भयावह परिस्थिती ओढवेल. आपलंच रक्षण करणाऱ्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या घटना समोर आल्यावर माझं खूप संताप होतो. सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी दिवस-रात्र झटत आहेत. हे लोक त्यांच्या घरच्यांसोबत जरा हि वेळ घालवत नाही आहेत आणि अशातच काही लोक ऐकत नसल्यामुळे पोलिसांच्या कामात भर टाकतात आहेत.”


हे ही वाचा – ‘माझा होशील ना’ टीमचे प्रेक्षकांसाठी सरप्राईज, कलाकार घरातून करणार मालिका शूट!


 

First Published on: April 15, 2020 4:36 PM
Exit mobile version