घरताज्या घडामोडी'माझा होशील ना' टीमचे प्रेक्षकांसाठी सरप्राईज, कलाकार घरातून करणार मालिका शूट!

‘माझा होशील ना’ टीमचे प्रेक्षकांसाठी सरप्राईज, कलाकार घरातून करणार मालिका शूट!

Subscribe

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझा होशील ना’ या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं वेगळं कथानक आणि त्यातील कलाकारांची फौज यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. मालिकेतील सई, आदित्य आणि नैना ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेत.

- Advertisement -

पण गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी आणि मुग्धा पुराणिक या कलाकारांची चाहत्यांना आठवण येतेय. म्हणूनच मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहे. मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये सई, आदित्य आणि नैना एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताहेत. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सई कॉफी करताना दिसतेय. हे सरप्राइज प्रेक्षकांनाही आवडलं आहे.

- Advertisement -

स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेची जागा ‘माझा होशील ना’ या मालिकेने घेतली. या मालिकेत विराजस मुख्य भूमिका साकारत असून त्याची ही पहिलीच मालिका आहे. त्याच्यासोबत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी अशी दिग्गज कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -