‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

'दादासाहेब फाळके' पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त त्याचप्रमाणे ‘हत्या’, ‘११० डेज’,’दीवाना’, ‘हद कर दी आपने’ यांसारख्या जवळपास १७७ सिनेमांसाठी कला दिग्दर्शन करणारे कला दिग्दर्शक लीलाधर सावंत सध्या बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. ते सध्या आपल्या पत्नीसोबत राहत आहेत. त्यांनी २५ वर्ष बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले मात्र तेच लीलाधर सावंत सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या पत्नी पुष्पा सावंत यांनी कलाकारांकडे मदतीसाठी मागणी केली आहे. (Dadasaheb Phalke award winning art director Leeladhar Sawant in financial crisis)

लीलाधर आणि त्यांच्या पत्नी पुष्पा सध्या खडतर आयुष्य जगत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. लीलाधर यांना आता फारसे बोलता येत नाही. त्यांच्यावर दोन वेळा बायपास सर्जरी करण्यात आल्या असून त्यांना दोन वेळा ब्रेन हॅमरेजचे अटॅक देखील येऊन गेले आहेत. त्यांच्याकडे असलेली सर्व पुंजी लीलाधर यांच्या उपचारांसाठी खर्च झाली. सध्या त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आम्ही दोघेही सध्या खूप कठीण काळात मुश्किलीने जगत आहोत. लीलाधर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी आम्हाल मदत करावी असे म्हणत लीलाधर यांच्या पत्नी पुष्पा यांनी सर्वांना विनंती केली आहे.

लीलाधर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, निर्माते किर्ती कुमारच्या यांच्या हत्या या सिनेमात लीलाधर यांनी अभिनेता गोविंदा याचे नाव सुचवले होते. २५ वर्षात लीलाधर यांनी तब्बल १७७ सिनेमांचे कला दिग्दर्शन केले आहे. २०१७ साली सिनेसृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने लीलाधर यांना गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे फिल्म फेअर आणि मानिकचंद पुरस्कारने देखील लीलाधर यांना गौरवण्यात आले आहे.


हेही वाचा – सोनू सूदने शिक्षण क्षेत्रात टाकले पाऊल, सीए शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थांना देणार मोफत शिक्षण

First Published on: July 2, 2021 5:21 PM
Exit mobile version