16 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार ‘दगडी चाळ 2’

प्राइम व्हिडिओतर्फे आज लोकप्रिय मराठी फिल्म ‘दगडी चाळ 2’ च्या डिजिटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली, या फिल्मचा डिजिटल प्रीमियर 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. 2015 साली याच नावाने प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर फिल्मचे हे सिक्वल असून, या अॅक्शन थ्रिलरमध्ये मुंबईतील दगडी चाळीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याचे वास्तव चित्रित करण्यात आले आहे. चंद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्मची निर्मिती संगीता अहिर व मंगलमूर्ती फिल्म्स, यांनी केली आहे. थिएटरमधील रिलीजनंतर प्रेक्षक व समीक्षकांनी या फिल्मची प्रशंसा केली होती. भारत आणि अन्य 240 देश-प्रदेशांतील प्राइम सदस्य हा ब्लॉकबस्टर अॅक्शन थ्रिलर स्ट्रीम करू शकतील.

मुंबईत पडद्याआड चालणाऱ्या गुन्ह्यांच्या कथा सांगणारे हे सिक्वेल पुन्हा एकदा कुप्रसिद्ध दगडी चाळीतच घडते. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे व अंकुश चौधरी पुन्हा एकदा अनुक्रमे डॅडी व सूर्याच्या भूमिकांमध्ये आहेत. चाळ पाडल्यानंतर आपली आयुष्ये नव्याने बांधण्याच्या प्रक्रियेतून ते जात आहेत. डॅडीच्या राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला पुढे घेऊन जातात, तर सूर्याचा सोनलसोबत (पूजा सावंत) रोमॅण्टिक प्रवास सुरू राहतो. रहस्यात गुंफलेल्या कथेतून थरारक पद्धतीने गुन्हे, हिंसा व समाजातील सत्तासंघर्ष उलगडत जातो.

दगडी चाळ 2 ही फिल्म, 240 देश-प्रदेशांतील प्राइम व्हिडिओ सदस्यांना 16 सप्टेंबर 2022पासून स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. प्रेक्षक यापूर्वीची दगडी चाळ (2015) ही फिल्मही प्राइम व्हिडिओवरच बघू शकतील.


हेही वाचा :

‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील तेजस्वीचा फर्स्ट लूक रिलीज

First Published on: September 14, 2022 2:41 PM
Exit mobile version