Daler Mehandi In Metaverse: दलेर मेहंदीने रचला इतिहास! मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

Daler Mehandi In Metaverse: दलेर मेहंदीने रचला इतिहास! मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

Daler Mehandi In Metaverse: दलेर मेहंदीने रचला इतिहास! मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

सध्या व्हर्च्युअल जगाची क्रेझ प्रचंड वाढत आहे. भारताने नुकताच 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला. या दिवशी भारतातील पहिली मेटावर्स कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या कॉन्सर्टमध्ये भारतीय गायक दलेर मेहंदी यांनी परफॉर्म केले. मेटावर्समध्ये परफॉर्म करणारे दलेर मेहंदी हे पहिले भारतीय गायक ठरले आहेत. दलेर यांनी 17 जानेवारीला सोशल मीडियावरुन मी प्रजासत्ताक दिनादिवशी मेटावर्समध्ये परफॉर्म करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भातील पोस्टर देखील त्यांनी शेअर केली होती. परफॉर्मन्स पार्टी नाईटमध्ये भारताचे पहिले मेटावर्स यामध्ये दाखवण्यात आले होते. याआधी ट्रैविस स्कॉट, जस्टिन बीबर यासारख्या आंतरराष्ट्रीय मंडळींनी मेटावर्समध्ये परफॉर्म केले आहे.

मेटावर्समध्ये दलेर मेंहनीने ‘नमो नमो इंडिया’ आणि ‘जागो इंडिया’ ही एव्हरग्रीन गाणी गायली मेटावर्समध्ये सामिल होणारा मी पहिला भारतीय असल्याचा माला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मेटावर्स साइट Party Night नुसार, पार्टी नाइट ब्लॉकचेनने पावर होणारा डिजिटल पॅरेलल स्पेस आहे. इथे तुम्ही मित्रांसोबत एक कस्टमाइजेबल अवतार करुन हँगआउट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन माणसे देखील पार्टीला इन व्हाइट करुन इव्हेंट जॉइन करू शकता. तुम्ही इथे खेळून NEFT’s कमावू शकतात.

भारतात मेटावर्सचा लवकरच विस्तार होणार आहे. अनेक देशांमध्ये मेटावर्स आले आहे. भारतातील टी सीरीज आणि हंगामा टीवीने एकत्र पणे मेटावर्समध्ये गाण्याची घोषणा केली होती. त्याआधी तमिळनाडूच्या एका जोडप्याने मेटावर्समध्ये लग्न केले होते. नवरा नवरीसह नातेवाईकही अवतार रुपात सहभागी झाले होते.


हेही वाचा –  Video: ‘मेरी ब्रा का साइज…’ Shweta Tiwari बोल्ड कमेंटमुळे चर्चेत, वेबसिरीज प्रमोशनमध्ये वादग्रस्त वक्तव्य

First Published on: January 27, 2022 2:02 PM
Exit mobile version