Hijab Controversy : ‘हिजाब मुस्लिम महिलांसाठी चॉइस नाही जबाबदारी’ दंगल फेम अभिनेत्री Zaira Wasim चं वक्तव्य

Hijab Controversy : ‘हिजाब मुस्लिम महिलांसाठी चॉइस नाही जबाबदारी’ दंगल फेम अभिनेत्री Zaira Wasim चं वक्तव्य

Hijab Controversy : 'हिजाब मुस्लिम महिलांसाठी चॉइस नाही जबाबदारी' दबंग फेम अभिनेत्री Zaira Wasim चं वक्तव्य

Actress Zaira Wasim on Hijab Controversy : दंगल सिनेमातून लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री जायरा वसीम अचानक सिनेक्षेत्रातून गायब झाली. जायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक आणि आयुष्यावर आधारीत काही कोट्स, काही धार्मिक व्हिडिओ शेअर करुन ती लोकांना मोटिवेट करत असते. कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब वादाची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. मुस्लिम महिलांनी आणि मुलींनी हिजाब घालावा यासाठी देशभरात चर्चा सुरू आहे. हिजाब वादावर जायरा वसीम हिने वक्तव्य केले आहे. जायराने भली मोठी सविस्तर पोस्ट लिहीत, ‘हिजाब हा मुस्लिम महिलांसाठी चॉइस नसून ती त्यांची जबाबदारी’, असल्याचे वक्तव्य केले आहे.

‘एक महिला हिजाब घातले तेव्हा ती तिची जबाबदारी पूर्ण करत असते. मुस्लिम महिलांसाठी हिजाब हा चॉईस नसून ती त्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी तिली ईश्वराकडून मिळाली आहे’, असे जायराने म्हटले आहे. जायराने पुढे म्हटले आहे की, ‘मी ही एक महिला आहे आणि मीही सन्मानाने हिजाब घातले. जिथे महिलांना धार्मिक परंपरांना मानण्यापासून थांबवले जाते किंवा त्यांना त्रास दिला जातो अशा सिस्टिमचा मी विरोध करते.’

‘मुस्लिम महिलांना शिक्षण की हिजाब यातील एक पर्याय निवडण्यासाठी सांगणे म्हणजे मुस्लिम महिलांविरोधात पक्षपात करण्यासारखे आहे. हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. तुम्ही त्यांना काही ठरावीक गोष्टी वापरण्याची सक्ती करत आहात. हा पक्षपात नाही तर काय आहे ?’, असा सवाल जायरा वासीमने केला आहे.


हेही वाचा – Mumbai : दारुच्या नशेत पोलिसांना मारहाण, दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

First Published on: February 20, 2022 2:31 PM
Exit mobile version