Deep Sidhu : प्लिज तु परत ये ! दीप सिध्दूच्या मृत्यूने खचली गर्लफ्रेंड रीना राय

Deep Sidhu : प्लिज तु परत ये ! दीप सिध्दूच्या मृत्यूने खचली गर्लफ्रेंड रीना राय

Deep Sidhu Girlfriend : पंजाबी अभिनेता दीप सिध्दूचा १५ फेब्रुवारीला रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दीप सिध्दू सोबत अपघातात त्याची गर्लफ्रेंड आणि होणारी पत्नी रीना राय देखील होती. रिना अपघातात जखमी झाली असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. ती या अपघातातून सुखरुप बाहेर आली असली तरी तिला दीपच्या जाण्याने फार मोठा धक्का बसला आहे. दीपच्या मृत्यूनंतर रीना पूर्ती कोलमडून गेली असून रीनाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

रीना अपघातात वाचली असली तरी तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या एक दिवस आधी दोघांनी एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. दीप अचानक गेल्याने रीना फार खचली असून सिध्दूच्या आठवणी तिना शांत बसू देत नाहीत.

‘मी पूर्णपणे तुटलेय. मी मनातूनही मेले आहे. दीप तु प्लिज परत येत आणि तुझ्या जोडीदाराला भेट. तु मला वचन दिलं होतं तु मला आयुष्यभर सोडून नाही जाणार. आय लव्ह यू मेरी जान, माझा आत्मा. तु माझ्या ह्रदयाचा आवाज आहेस.’

रीनाने पुढे म्हटलेय, ‘मी इथे हॉस्टिपलमध्ये अंथरुणात खितपत पडलेली असताना मला सारखं वाटतं आहे की तु येशील आणि हळूच माझ्या कानात आय व्हव यू मेरी जान म्हणशील आणि आपण दोघे कायम सोबत असू… आपण एकत्र आपलं आयुष्य तयार करत होतो आणि तु निघून गेलास. हमसफर कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत पण मी तुला एका दुसऱ्या टोकावर भेटेन’.

रीनाची ही भावूक पोस्ट पाहून सगळेच फार दु:खी झाले आहेत. रीना सध्या कोणत्या परिस्थितीचा सामना करतेय हे या पोस्टमधून सर्वांच्या लक्षात येत आहे.


हेही वाचा – Deep Sidhu Girlfriend : कोण आहे दीप सिध्दूची गर्लफ्रेंड रीना राय ?…

 

First Published on: February 17, 2022 8:44 AM
Exit mobile version