दिलदार दीपिका; अॅसिड पीडितेला केली 15 लाखांची मदत

दिलदार दीपिका; अॅसिड पीडितेला केली 15 लाखांची मदत

दिलदार दीपिका; अॅसिड पीडितेला केली 15 लाखांची मदत

अॅसिड हल्ल्यामध्ये बचावलेल्या बाला या महिलेची प्रकृती सध्या गंभीर असून. सध्या बालाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कौटुंबिक वादामधून बालावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता अशी माहिती समोर येत आहे. बालावर तब्बल 12 शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिने आपले आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरूवात केली होती. सध्या बाला शीरोज कॅफेमध्ये काम करतेय मात्र या अॅसिड हल्ल्यानंतर तिचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं होतं. एका धक्क्यातून सावरत असताना बाला मूत्रपिंडाचा आजारामूळे मृत्यूशीं झूंज देत आहे. बालाला किडनीवर उपचार करण्यासाठी 16 लाख रुपयांची गरज आहे. ती काम करत असणाऱ्या कॅफेतर्फे ऑनलाइन क्राउड फंडिंगच्या माध्यमातून बालावर उपचार कण्यासाठी पैसे गोळा केले जात आहे. दरम्यान हि माहिती अभिनेत्री दीपिका पादुकोणला समजली तेव्हा दीपिकाने क्षणाचाही विलंब न लावता सकाळी बालाला 10 लाख रुपयांची मदत केली आणि रात्री पुन्हा 5 लाख रुपये पाठवले. आता दीपिकाने दाखवलेल्या दिलदारीमुळे बालाला उपचार करणे शक्य होणार आहे.(deepika padukone donates 15 lakhs of acid attack survivor woman)

 

दीपिकाने छपाक या चित्रपटाच्या माध्यमातून अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. यामुळे दीपिकाला बालाचे दु:ख पाहावले नाही.बाला उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे वास्तव्यास आहे. बाला 9 वर्षाची असताना कौटुंबिक वादादरम्यान आजोबा आणि तिच्या तोंडावर अॅसिड फेकण्यात आलं. या हल्ल्यमध्ये तिझ्या आजोबांचा मृत्यू झाला मात्र 12 शस्त्रक्रिया केल्यानंतर बाला बचावली.

कॉमेडी नाइट्स विथ कपिलमधून समाजाला अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या महिलांची व्यथा बालाने मांडली होती. तसेच काही काळापूर्वी मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या छपाक सिनेमात बालाने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतही काम केलं आहे.


हे हि वाचा – अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणेश वंदनेचा व्हिडीओ व्हायरल

First Published on: September 3, 2021 2:04 PM
Exit mobile version