घरमनोरंजनअमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणेश वंदनेचा व्हिडीओ व्हायरल

अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणेश वंदनेचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

गणेश वंदना या गाण्याचा कालावधी 4 मिनिटे 49 सेकंदाचा असून सध्या हे गाण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी  प्रत्येक घरामध्ये आरास देखील तयार करण्यात येत आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बाप्पासाठी विशेष गाण गायलं असून नुकतचं हे नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गणरायाच्या आगमनासाठी त्यांनी ‘गणेश वंदना’ या गाण्यामध्ये सर्वांना एक खास संदेश दिला आहे.(Amruta Fadnavis New Song Ganesh Vandana Is Out )

कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या एका डॉक्टर महिलेवर आधारीत हे गाण चित्रीत करण्यात आलं असून यामध्ये अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील डॉक्टर महिलेची भूमिका साकारली आहे. या महिलेच्या कुटुंबात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने उत्साहात बाप्पाचे स्वागत करत असतात. एककीडे घरामध्ये मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन झाले असते. तर दुसरीकडे त्या महिलेला डॉक्टर असल्यामुळे रुग्णालयता तातडीने बोलावण्यात येते. दरम्यान आपले कर्तव्य बजावण्यास तप्तर असलेली महिला क्षणाचाही विलंब न करता रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णालयात हजर होते. तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला यासाठी पाठिंबा असल्याचे गाण्यात दाखवलं आहे.
गणेश वंदना या गाण्याचा कालावधी 4 मिनिटे 49 सेकंदाचा असून सध्या हे गाण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी गणेश वंदना हे गाण अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच आरोग्य सेवेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर यांना समर्पित केलं आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडिया अकांऊटवर या गाण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली असून कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, विजय दयाल यांनी संगीतबद्ध केलेले, ‘गणेश वंदना’ हे ‘औं गण गणपतये’ आणि ‘मोरया रे’ चे सुंदर संयोजन आहे. मला आशा आहे की हे गाण तुमच्या मनाला नक्कीच भावेल.

- Advertisement -

हे हि वाचा – Money Heist Season 5: मनी हाइस्टचा 5 वा सीझन कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ,जाणून घ्या

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -