दीपिका-रणवीर wedding : पहिला फोटो व्हायरल

दीपिका-रणवीर wedding : पहिला फोटो व्हायरल

फाईल फोटो

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीप-वीरचं ग्रॅण्ड वेडिंग पार पडणार आहे. नुकतेच दीपिका आणि रणवीर त्यांच्या कुटुंबियांसोबत इटलीला रवाना झाले. दरम्यान, लेक कोमोवर दीप-वीरच्या ग्रँड वेडिंगची तयारी सुरु झाली असून तयारीचा पहिला फोटो समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तूफान व्हायरल होतो आहे. दीपवीर या इन्स्टाग्रामवरील फॅन पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तयारी… अशा अर्थाचं कॅप्शन देण्यात आलं आहे. या फोटोला सोशल मीडियावर नेटिझन्सकडून भरपूर पसंती मिळते आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनीही या फोटोवर भरभरुन कमेंट करत, त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो लेक कोमोचा असल्याचा दावा केला जात असून, फोटोमध्ये काही लोक सजावट करताना दिसत आहेत. दोन दिवसांनी अर्थात १४ नोव्हेंबरला दीप-वीर नार्थ इंडियन पद्धतीने विवाह करणार आहेत.

या विवाह सोहळ्यात दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबियांसह काही मोजकेच लोक सहभागी होणार असल्याचं समजतंय. लग्नानंतर बंगळुरु येथे २३ नोव्हेंबर रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी दीपिका आणि रणवीर या महिन्याच्या १४-१५ तारखेला लग्नबंधानात अडकणार आहेत. इंडस्ट्रीतले हे दोन लव्हबर्ड्स गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. याकाळात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. काधी या दोघांनी अफेअरच्या बातम्यांचं खंडन केलं होतं, तर कधी मजा-मस्करीत या गोष्टीची कबुलीसुद्धा दिली होती. आता रणवीर आणि दीपिकाचं ग्रँड वेडिंग कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा ऑनस्क्रीन कधी दिसणार याबाबतही चाहते उत्सुक आहेत.


वाचा: प्रियांका-निकच्या लग्नात बॉलीवूडला ‘नो एंट्री’?

First Published on: November 11, 2018 4:10 PM
Exit mobile version