Deepika Padukone ला मिळाला ‘Time 100 Impact Awards 2022’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Deepika Padukone ला मिळाला ‘Time 100 Impact Awards 2022’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वबळावर एक मोठे नाव कमावलेले आहे. या अभिनेत्रीने एक वेळ अशी सुद्धा पाहिली आहे जेव्हा ती नैराश्याचा सामना करत होती. दीपिकाने केवळ नैराश्यापासून स्वतःला वाचवले नाही तर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही खूप काम सुद्धा केले आहे. दीपिकाच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आल आहे.

28 मार्च रोजी दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिचा आनंद व्यक्त केला. पोस्ट शेअर करुन चाहत्यांसोबत आनंद व्यक्त करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला वाटतं की सोमवारची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.’ यासोबतच तिने ‘टाइम’ ला टॅग करत त्यांचे आभार मानले.

टाइम 100 इम्पैक्ट अवॉर्ड

या अवॉर्डने जगभरातल्या त्या 100 निवडक लोकांना सन्मानित केलं जातं, जे त्यांच्या ओळखीचा वापर एक चांगले भविष्य तयार करण्यासाठी करतात.

दीपिका पदुकोणने एकदा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 2014 मध्ये ती डिप्रेशनचा सामना करत होती. तिच्या म्हणण्यानुसार, तिची आई उज्जला पदुकोणने त्यावेळी दीपिकाच्या रडण्यामुळे तिची वेदना समजून घेतली. तिच्या आईला समजले की, ती ब्रेकअप किंवा तणावापेक्षा जास्त मोठ्या संकटात आहे. दीपिकाच्या म्हणण्यानुसार, तिच्या आईने तिला या आजारावर मात करण्यासाठी आणि लढण्यासाठी मदत केली होती आणि सल्लेही दिले होते.

दीपिका म्हणाली होती, ‘एकदा माझे कुटुंबीय मला भेटायला आले होते, जेव्हा ते लोक परत जात होते .तेव्हा ते आपली बॅग पॅक करत असताना, त्यावेळी मी त्यांच्या खोलीत होते आणि अचानक मी रडायला सुरुवात केली.’

दीपिकाने सांगितले होते की, ‘मला रडताना पाहून माझ्या आईला काय झालं आहे ते समजलं. त्यावेळी तिने माझ्या रडण्याचे कारण विचारले परंतु त्यावेळी मी तिला काहीच सांगू शकले नाही. परंतु तिच्या अनुभवामुळेच मला मदत घेण्याची प्रेरणा मिळाली.

आता दीपिका नैराश्याचा सामना करत असलेल्या लोकांना मदत करते. त्यासाठी तिने मेंटल हेल्थ फाउंडेशनही सुरू केले आहे. ज्याचे नाव आहे ‘Live Love Laugh Foundation’आहे.


हेही वाचा :Vidya Balan चे चित्रपट OTT वर गेल्याने Bhumi Pednekar ला होणार फायदा

First Published on: March 28, 2022 10:45 PM
Exit mobile version