घरमनोरंजनVidya Balan चे चित्रपट OTT वर गेल्याने Bhumi Pednekar ला होणार फायदा

Vidya Balan चे चित्रपट OTT वर गेल्याने Bhumi Pednekar ला होणार फायदा

Subscribe

भूमी पेडणेकर हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या चित्रपटांतून प्रेक्षकांना तितकीच आशा लागू लागले, जितके प्रेक्षक विद्या बालनच्या चित्रपटांतून करतात. विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर' आणि 'कहानी' या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत जो बदल झाला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विद्या बालन हिच्या पावलावर पाऊल ठेवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहे. विद्याचा सलग तिसरा चित्रपट ‘जलसा’ OTT वर आला असून, भूमी पेडणेकर सध्या मोठ्या पडद्यावर तिची जागा घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या वर्षी तिच्याकडे असलेल्या चित्रपटांमध्ये अभिनयाच्या नऊ भूमिकांपैकी प्रत्येक भूमिका समाविष्ट असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर पुढील महिन्यापासून ती अजय बहल दिग्दर्शित ‘द लेडी किलर’ या नवीन चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे.

- Advertisement -

भूमी पेडणेकर हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या चित्रपटांतून प्रेक्षकांना तितकीच आशा असते. प्रेक्षक विद्या बालनचे चित्रपटही आवर्जून बघतात. विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’ या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत जो बदल झाला आहे, त्याचा फायदा इतर सर्व अभिनेत्रींनाही होत आहे. निर्मातेसुद्धा महिला विषयक चित्रपट करण्याची हिंमत करत आहेत, इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर देखील अशा चित्रपटांच्या यशामुळे तापसी पन्नू, सुष्मिता सेन, रवीना टंडनपासून ते तृप्ती डिमरीपर्यंतच्या अभिनेत्रींचं करिअर बदलून गेलं आहे.

- Advertisement -

भूमी पेडणेकर पुढील आठवड्यापासून ‘द लेडी किलर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याशिवाय तिच्याकडे असलेले इतर चित्रपटही लक्षवेधी आहेत. या चित्रपटांमध्ये अनुभव सिन्हाचा ‘भीड़’, शशांक खेतानचा ‘गोविंदा आला रे’, अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’, सुधीर मिश्राचा ‘अफवाह’ आणि गौरी खान द्वारा प्रोड्यूस केला जाणारा ‘भक्षक’ या चित्रपटाचा सुद्धा सहभाग आहे.

भूमी म्हणते की , “मला २०२२ हे वर्ष खूप व्यस्त असल्याचे दिसत आहे, पण माझ्याकडे काही उत्तम स्क्रिप्ट्स हाती आल्याने मी तक्रार करू शकत नाही. ‘बधाई दो’ नंतर मला वाटत नाही की, मला या वर्षी विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. मनापासून सांगायचे तर मी याचा विचारही करत नाही. मी एकामागून एक अशा सहा चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. माझे तीन नवे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. माझा प्रत्येक चित्रपट एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षक माझ्या सर्व चित्रपटांवर भरभरून प्रेम करतील.”


हेही वाचा :Amey Wagh: “पाठीमागे वाईट बोलणाऱ्यांसाठी आरसा”,अमेय वाघने मारला नेटकऱ्यांना टोमणा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -