सुशांतच्या वडीलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुशांतच्या वडीलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुशांतच्या वडिलांची चित्रपटांवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेची काळी बाजू सर्वांच्या समोर आली. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण,नेपोटीझम, एखाद्या कलाकाराची बदनामी कशी केली जाते. आणि इतर काही गोष्टी लोकांसमोर उघड झाल्या. सुशांतच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. अनेक घडामोडी सुशांत गेल्याने उघडकीस आल्या. यानंतर सुशांतच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’, ‘सुसाइड ऑर मर्डर : ए स्टार वाज लॉस्ट’ या बायोपिक सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमा विरोधात सुशांतच्या वडीलांनी कोर्टात धाव घेतली होती. आता दिल्ली हायकोर्टाने सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली याचिका रद्द केली आहे. या याचिकेत सिनेमा बनवण्यास रोख लावण्यात आली होती. सुशांतच्या वडीलांच्या मते त्यांच्या मुलाच्या नावाचा वापर करून सिनेमा बनवण्यात येत असलायचे आरोप लावण्यात आले होते. यामुळे सिनेमा तयार होऊ नये म्हणून त्यांनी केस दाखल केली होती.


हे हि वाचा – Khatron Ke Khiladi 11मधून थेट पाच खिलाडी बाहेर!

First Published on: June 10, 2021 2:42 PM
Exit mobile version