प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांकडून परवानगीस विरोध

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांकडून परवानगीस विरोध

प्रसिद्ध स्टँडअप कॉमे़डियन मुनव्वर फारूकी सासत्याने एक चर्चेचा विषय असतो. नुकतचं मुनव्वर फारूकीचा दिल्लीतील शो रद्द करण्यात आवा आहे. दिल्ली पोलिसांच्या परवाना युनिचटने मुनव्वरची शोला परवानगी देण्याची विनंतीस स्पष्ट नकार दिला आहे. 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये त्याच्या शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या शोला विश्वू हिंदू परिषदेने विरोध दर्शववा होता, त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी मुनव्वर फारुकीचा शोस नकार दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनवरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती. फारूकीचा शो झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील असे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या पत्रात म्हटले होते. हे पत्र विश्व हिंदू परिषद दिल्लीचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.

विश्व हिंदू परिषदेने लिहिले पत्र लिहिले की, मुनव्वर फारूकी नावाचा कलाकार 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सिविक सेंटरमधील केदारनाथ स्टेडियमनमध्ये एक शो आयोजित करत आहे. हा माणूस त्याच्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवतो, त्यामुळे भाग्य नगरमध्ये नुकताच जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे विनंती आहे. की हा शो तात्काळ रद्द करा, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करुन शोचा निषेध करतील. यानंतर दिल्ली पोलिसांच्या लायसन्सिंग युनिटने मुनव्वर फारुकीचा शो करण्यासाठी परवानगी नाकारली आहे.

यापूर्वीही शो झाला होता रद्द

2021 मध्ये मुनव्वर फारूकीला त्याच्या शोमधील विनोदामुळे अटक केली होती, यानंतर त्याला एक महिना तुरुंगात काढला, तेव्हापासून कॉमेडियनचे शो हे कायदा आणि प्रशासनासमोर आव्हान बनले आहे,गेल्या आठवड्यात मुनव्वर फारूकीचा बंगळुरुमधील शो रद्द करण्यात आला होता.

मुनव्वर फारुकी कंगनाच राणौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये मुनव्वरने अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत विजय मिळवला होता, मात्र याचा त्याचा कॉमेडी करिअरला फारसा फायदा झाला नाही.


आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने केली मोठी घोषणा; लेखन क्षेत्रात करतोय पदार्पण


First Published on: August 27, 2022 9:45 AM
Exit mobile version