देवीचा फोटो असलेला जॅकेट घातल्याने देसी गर्ल पुन्हा ट्रोल…

देवीचा फोटो असलेला जॅकेट घातल्याने देसी गर्ल पुन्हा ट्रोल…

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियंका चोपडा आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मिस वर्ल्ड २००३ आणि बॉलिवूड ते हॉलिवूडची सुपरस्टार म्हणून प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. एॅक्टींग आणि फॅशनच्या बाबतीत तर तिला तोडच नाही. प्रियंका सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. पण ही देसी गर्ल कित्येकदा ती तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेटकऱ्ंयांच्या ट्रोलिंगचा शिकार होते. प्रियंका पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. यामागील कारण म्हणजे तिने घातलेले जॅकेट. प्रियंकाने निक सोबतचा तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने घातलेले जॅकेट वर काली देवी चे चित्र पाहायला मिळाले आहे. बहुतेक लोकांना फॅशनसाठी देवाच्या चित्राचा असा वापर केलेला आवडत नाही. म्हणूच प्रियंका आता नेटकऱ्यांच्या चांगलीच निशाण्यावर आली आहे.

नुकतेच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांचे जुने फोटो इन्स्टाग्रामवर समोर आले होते. जोनस बदर्स यांच्या सकर फॉर यू या गाण्यातील चित्रीकरणादरम्यानचा फोटो होता. या चित्रात हे जोडपं एकमेकांचा हात पकडताना दिसत आहेत. हा फोटो त्यांची गोड केमिस्ट्री दाखवत असला तरी लोकांच्या नजरा प्रियंकाच्या जॅकेटवरच राहिल्या आहेत. तिच्या जॅकेटवरील देवीच्या चित्रामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. पण लोकांच्या ते पसंतीस पडले नाही. तसेच प्रियंकाच्या या फोटोवर प्रेक्षकांच्या नकारात्मक टिप्पण्या येण्यास सुरुवात झाली. कोणी प्रियंकाला ‘लाज वाटते का’ अशी प्रतिक्रिया केली तर, कोणी तिला ‘धर्माचा अवमान करू नका’ अशी शिकवण दिली. त्याचबरोबर काहींनी प्रियांकाला ‘फॅशनपासून देवाला दूर ठेवा’ अशी शिफारस केली होती.


हे वाचा- वरच्या पातळीवर जाण्यासाठी जो प्रोत्साहित करतो तोच खरा मित्र.. स्नेहलता वसईकर

First Published on: May 12, 2021 4:47 PM
Exit mobile version