कोरोनाच्या काळात बेरोजगार झाला ‘हा’ लोकप्रिय गायक!

कोरोनाच्या काळात बेरोजगार झाला ‘हा’ लोकप्रिय गायक!

कोरोनाच्या काळात बेरोजगार झाला 'हा' लोकप्रिय गायक!

कोरोना काळ सुरू झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. अनेक लोकं बेरोजगार झाले. यामध्ये फक्त सामान्य लोकं नसून सेलिब्रिटांचा देखील समावेश आहे. दरम्यान बॉलिवूड आणि पंजाबी लोकप्रिय गायक मिका सिंह कोरोनाच्या काळात बेरोजगार झाल्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. मिका सिंह म्हणाला की, ‘माझ्यासारखे अनेक लोकं गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून आहेत. मला मागील आठ महिन्यांपासून कोणतही काम मिळालेले नाही आणि माझ्यासारखे असे अनेक लोकं आहेत, हे मला माहित आहे. लोकांना बऱ्याच काळापासून चित्रपटगृहात सिनेमे पाहायला मिळाले नाही आहेत. त्यामुळे आता सिनेमा चित्रपटगृहात पाहायला जाण्याचीही अचूक वेळ आहे.’

‘सयोनी’ या चित्रपटात तन्मय सिंह, मुसकान सेठी, राहुल रॉय, योगराज सिंह, उपासना सिंह मुख्य भूमिकेत आहेत. नितिन कुमार गुप्ता आणि अभय सिंघल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


हेही वाचा – अरबाज खान प्रॉडक्शनचा हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला NCBकडून अटक


 

First Published on: December 10, 2020 2:12 PM
Exit mobile version