घरताज्या घडामोडीअरबाज खान प्रॉडक्शनचा हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला NCBकडून अटक

अरबाज खान प्रॉडक्शनचा हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला NCBकडून अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली. आता नार्कोटिस कंट्रोल ब्युरो (NCB) ने दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अरबाज खान प्रॉडक्शनचा हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबे याला ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. एनसीबीने सूरज गोडांबे याच्याकडून ११ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीत सूरज गोडांबे याने अनेक मोठ्या लोकांची नावे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

काल (बुधवारी) एनसीबीने मुंबईतील ड्रग्ज पुरवणारा मोठा मासा आजम शेख याला रंगेहाथ पकडले. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोकड जप्त केली आहे. तर आज बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर स्टायलिस्ट सूरज गोडांबेला एनसीबीने बेड्या घातल्या आहेत. त्याच्याकडून ११ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहेत. सूरज गोडांबे हा अरबाज खान प्रोडक्शनमध्ये हेअर स्टायलिस्ट आणि मेक-अप आर्टिस्ट म्हणून काम करतो. या विभागाचा सूरज एचओडी आहे. अरबाज खानसोबत ‘दबंग’सारखे अनेक मोठे सिनेमे त्याने केले आहेत. तसेच अनेक प्रसिद्ध कलाकरांसोबत त्याने काम केले आहे. त्यामुळे सध्या सूरजने आणखी किती जणांना ड्रग्ज दिले आहे? आणि त्याला कोणी ड्रग्ज पुरवले आहेत? याचा तपास केला जात आहे. दरम्यान चौकशीत अनेक मोठ्या लोकांची नावे समोर येत असून ती नावे काय आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

या आठड्यात ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत एनसीबीला चांगले यश आले आहे. कारण काल एनसीबीने ड्रग्ज पुरवणारा आजम शेख आणि रिगल महाकाल याला अटक केली. तसेच यापूर्वी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या अनुज केशवानी याच्यावर कारवाई केली.


हेही वाचा – SSR death case: ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक; NCB ची कारवाई

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -