‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम रेश्मा-गौरव अडकणार विवाह बंधनात ?

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम रेश्मा-गौरव अडकणार विवाह बंधनात ?

suvrat joshi- sakhi gokhale

गेल्या काही महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. यामध्ये प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी विवाह बंधनात अडकले आहेत. येत्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक लव्ह बर्ड्सची जोडी विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. ही जोडी म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी या विनोदी मालिकेतील सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेले सखी आणि सुव्रत यांनी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ पाडली होती. हे दोघे नेहमीच एकत्र बघायला मिळतात. मग तो कोणताही कार्यक्रम असो किंवा कॉफी, सिनेमाला जातानाचे फोटे सोशल मीडियावर दोघांसह त्यांचे चाहतेही ते शेअर करतात. दोघांचे नाते हे दिवसेंदिवस बहताना दिसत आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुव्रतने सखीसाठी टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले होते. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत दोघांनीही एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. दोघांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघे अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती.

आता सखी गोखलेच्या एका फोटोवरून ती लग्न करणार असल्याचे समजतेय. तिच्या या फोटोला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. यावर सखीने अजून कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नसले तरीही सखी आण सुव्रत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून हे दोघे कधी विवाह बंधनात अडकणार? याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.

First Published on: April 2, 2019 5:13 PM
Exit mobile version