26 Years of DDLJ: ‘त्या’ गाण्यात टॉवेल गुंडाळून डान्स करण्यासाठी काजोलने दिला होता नकार

26 Years Of DDLJ: त्या गाण्यात टॉवेल गुंडाळून डान्स करण्यासाठी काजोल ने दिला होता नकार

बॉलिवूडमधील असे काही सिनेमे आहेत जे रिलिज झाल्यानंतर ही अनेक वर्ष त्या सिनेमांची जादू कायम आहे. असाच एक सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ म्हणजेच सर्वांचा लाकडा DDLJ. आज या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाली आहेत (Dilwale Dulhania le jayenge complete 26 years ) २० ऑक्टोबर १९९५ साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने थिएटर्समध्ये सर्व सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले. राज आणि सीमरन यांच्या भूमिकेत अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांनी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठवले होते. आजही ही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो. सिनेमातील अनेक सीन्स आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. मग तो रेल्वे डब्ब्यात चढतानाचा सिनेमातील शेवटचा सीन असो, राज सीमरनचे डायलॉग किंवा टॉवेल बांधून केलेला काजोलचा डान्स असो. काजोलने एका मुलाखतीत तिचा टॉवेल बांधून नाचतानाच्या शॉर्टविषयी एका खुलासा केला. DDLJ ला २६ वर्ष पूर्ण होताना जाणून घेऊया सिनेमातील काही किस्से.

शाहरुख आणि काजोलच्या करियरला या सिनेमाने चार चाँद लावले होते. मीडिया रिपोर्टनुसार, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेसाठी सिनेमाचे निर्माते यश चोपडा यांनी आधी अभिनेता सैफ अली खान याला विचारले होते. इंडो अमेरिकन स्टोरीमध्ये सैफ अली खान परफेक्ट बसेल असे त्यांना वाटले होते. मात्र सैफने सिनेमाला नकार दिला आणि सिनेमात प्रमुख भूमिकेसाठी शाहरुख खानची निवड करण्यात आली. एक अभिनेता आपल्या आयुष्यात जी स्वप्ने पाहतो की स्वप्ने दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे या सिनेमाने शाहरुखच्या आयुष्यातील सगळी स्वप्ने पूर्ण केली.याच सिनेमामुळे शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

सिनेमाची २६ वर्ष सेलिब्रेट करत यश राज फिल्मसने ‘एक टाइमलेस सिनेमा जो आम्हाला रोमान्सच्या विश्वास घेऊन गेला. हा सिनेमा नेहमीच्या आमच्या ह्रदयाजवळ राहिल’ असे म्हणत एका व्हिडिओ शेअर केला आहे.

सिनेमातील मेरे ख्वाबो मे जो आये हे गाणे त्यावेळीस सॉलिड हीट झाले होते. ज्यात काजोल टॉवेल बांधून नाचताना दिसली होती. या सीन विषयी काजोलने एका मुलाखतीत खुलासा केला होता. तिने म्हटलं होत, या गाण्यासाठी मला रेडी करण्यासाठी निर्माते यश चोपडा यांना खूप पापड लाटावे लागले होते. या गाण्याचे शुटींग करताना पहिल्यांदा फार विचित्र वाटले होते. टॉवेल बांधून शूटींग करायचे आणि त्यावर नाचायचे ही आयडीया माझ्या पसंतीस आली नव्हती. मात्र यश चोपडा यांनी माझी मनधरणी केल्यानंतर मी गाण्यासाठी तयार झाली होती.

काजोलने पुढे असे देखील म्हटले होते की, सिनेमातील काजोलची भुमिका फार बोर होती. आधी मी या भूमिकेसाठी आधी नकार दिला होता. मात्र मी सीमरनच्या व्यक्तिमत्त्वाच्या मी प्रेमात पडली. आपल्या आजूबाजूला देखील अशा अनेक सीमरन आहेत ज्या आपलं कुटुंब, परंपरा यांना सर्वात जास्त प्राधान्य देतात याची मला कुठेतरी जाणीव झाली आणि मी सीमरनच्या प्रेमात पडले.

दिलवाले दुल्हनिया ले जायेगे या सिनेमाने हिंदी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलला होता. त्यावेळी सिनेमाने १० फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले तसेच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४ कोटींचा गल्ला जमावला होता. तर जगभरात १०० कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. DDLJ हा पहिला सिनेमा होता ज्याचे बिहांइड द सीन्स सुद्धा दूरदर्शवर टेलिकास्ट करण्यात आले होते. मुबईच्या मराठा मंदिर सिनेमागृहात हा सिनेमा तब्बल २५ वर्ष प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षक आजही सिनेमाला तितकचं प्रेम देत आहेत.


हेही वाचा – Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एंट्री, मालिकेत एक नवा ट्विस्ट

First Published on: October 20, 2021 7:48 PM
Exit mobile version