या अतरंगी फोटोंमुळे ट्रोल झाली दिशा पटानी

या अतरंगी फोटोंमुळे ट्रोल झाली दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी आपल्या चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळेच चर्चेत असते. आपल्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दिशाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. या फोटोमुळे लोकांनी तिच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. सध्या दिशा सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ मध्ये दिसणार आहे. यापूर्वी दिशा टायगर श्रॉफबरोबर ‘बागी-२’ या चित्रपटात झळकली होती.

दिशा नेहेमीच आपल्या ग्लॅमर लूकमुळे आणि बोल्डपणामुळे ओळखली जाते. यावेळेस लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून दिल्या. या फोटोमध्ये दिशा अंतर्वस्त्र दिसते आहे. त्यामुळे अनेकांनी तिला कमेंटमध्ये ट्रोल केले.

First Published on: November 6, 2018 7:58 PM
Exit mobile version