दिशा पटानीच्या बॉडीगार्डची दादागिरी!

दिशा पटानीच्या बॉडीगार्डची दादागिरी!

disha patanis bodyguard and photographer arguement

चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमरस अभिनेत्री असा ठसा उमटवणारी दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. तसेच तिचा चाहता वर्गही काही कमी नाही. त्यामुळे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. नेहमीप्रमाणे दिशा दिसताच तिचे चाहते आणि अनेक फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. अशातच दिशाच्या अंगरक्षक आणि एका फोटोग्राफरची धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाली. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अनेक वेळा सेलिब्रिटी दिसल्यावर त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोफ आवरत नाही. परंतु हाच मोह बऱ्याच जणांच्या याधीही अंगलट आल्याचा आपण पाहिले असेल. अशाचप्रकारे दिशाला पाहिल्यावर अनेक चाहते आणि फोटोग्राफर तिचे फोटो काढण्यासाठी पुढे आले. फोटोग्रफर्सने तर तिच्याभोवती विळखाच घातला होता. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिचे अंगरक्षक पुढे आले असता अंगरक्षक आणि एका फोटोग्राफरचे वादावाद आणि धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात विशेष म्हणजे या प्रकारानंतर अंगरक्षकाने फोटोग्राफरची माफीही मागितली.

First Published on: February 25, 2020 12:49 PM
Exit mobile version