अफवांवर विश्वास ठेवू नका, मालिका सोडण्याचा विचार नाही- अमोल कोल्हे

अफवांवर विश्वास ठेवू नका, मालिका सोडण्याचा विचार नाही- अमोल कोल्हे

अमोल कोल्हे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भुमिकेत असणारे डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा हात सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉ.अमोल कोल्हे मालिका सोडणार या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता यावर डॉ.कोल्हे यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मालिका सोडण्याचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलय.

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांचा पक्षातील प्रवेश आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुरमधून ते संभाव्य उमेदवार म्हणून दावेदार मानले जात आहेत. या काळात अमोल कोल्हे मालिका सोडणार अशा बातम्यांना उधाण आलं होतं. मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून म्हटलं आहे की, ‘आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील! धन्यवाद!’.डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्पष्टीकरणामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद होणार आहे.

यावरून चर्चा रंगली

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्ययातील कौळाने येथील भूमिपुत्र असल्याने दरवर्षी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी महाराजांची १५६ वी जयंती होती. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना महाराजा सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सत्कारावेळी डॉ.कोल्हे यांनी मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. यामुळे अमोल कोल्हे मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

First Published on: March 12, 2019 1:38 PM
Exit mobile version