दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा; सायरा बानो यांनी ट्विटद्वारे चाहत्यांना आवाहन

दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा; सायरा बानो यांनी ट्विटद्वारे चाहत्यांना आवाहन

दिलीप कुमार यांच्या मृत्यूची पसरली अफवा; सायरा बानो यांनी ट्वीट करून चाहत्यांना केले 'हे' आवाहन

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती दिलीप कुमार यांच्या ट्वीटरच्या अधिकृत अकाउंटवरून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी वातावरण पसरले. मग यादरम्यानच दिलीप कुमार यांच्या मृत्यू झाल्याच्या अफवांना उधाण आले आणि आणखीनच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. व्हॉट्सअॅपवर दिलीप कुमार यांच्या मृत्यूची बातमी वेगाने पसरत होती. पण अखेर दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी चाहत्यांची चिंता दूर केली आणि त्यांना आवाहन देखील केले.

दरम्यान दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांची पत्नी त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती देत असतात. आता देखील त्यांनी दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर ट्टीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘व्हॉट्सअॅपवरील फॉवर्ड मॅसेजेवर विश्वास ठेवू नका. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ते दोन-तीन दिवसांत घरी परतील.’ या ट्वीटनंतर दिलीप कुमार यांचा चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

सायरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांना रुटीन चेकअपसाठी नॉन कोविड पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. नितिन गोखले यांची टीम त्यांची देखभाल करत आहे. दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा आणि तुम्ही सुरक्षित राहा, असे सायरा बानो यांनी ट्वीट केले होते.

११ डिसेंबर १९२२मध्ये दिलीप कुमार यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे पहिले नाव यूसुफ खान होते. त्यानंतर पडद्यावर त्यांना दिलीप कुमार नावाने ओळखू लागले. दिलीप कुमार यांनी आपले नाव एका निर्मात्याच्या म्हणण्यानुसार बदलले होते. ज्यानंतर त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले.


हेही वाचा – शरद पवारांनी हिंदुजा रुग्णालयात घेतली दिलीप कुमार यांची भेट, तब्येतीची विचारपुस


 

First Published on: June 7, 2021 9:36 AM
Exit mobile version