Video: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज!

Video: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज!

कंगना रानौत

शिवसेना खासदार संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्याभरातून तिच्यावर टीका झाली. संजय राऊत यांनी कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. कंगनाने मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं विधान केलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर सणसणीत उत्तर दिलं. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अशी केली. यानंतर कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली.  मात्र आता कंगनानेच शांत होण्याचा आणि वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

वडील अमरदीपसिंग राणौत यांनी कंगनाला समजवल्यानंतर आता बॉलिवूडची क्वीन कंगना शांत झाली आहे. कंगनाच्या मुंबईत जाण्याच्या निर्णयाने वडिल चिंतेत होते. शनिवारी वडिलांनी घरी मनालीला पोहचले. या संपूर्ण घटनेने अभिनेत्रीचे वडील अस्वस्थ झाले. चर्चेनंतर कंगनाने तिच्या आई आशा रणावतला वचन दिले की ती आता कोणत्याही वादात पडणार नाही. त्यामुळे आई – वडिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन कंगनाने यापुढे कोणत्याही वादात न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कंगनाने घरी झालेल्या चर्चेचा एक व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आणि लिहीले आहे की, आपण माफियाशी लढा देऊ शकतो. सरकारला आव्हान देऊ शकतो, परंतु घरी होणाऱ्या भावनिक ब्लॅकमेलिंगचा सामना करणे कठीण आहे. माझ्या घरात घडलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहू शकता. शुक्रवारी सकाळी कंगनाने आणखी एक ट्विट केले. असे लिहिले आहे की प्रत्येकाला लक्ष्मीबाई आणि भगतसिंग हवे आहेत, परंतु त्यांच्या घरात नाही. आपल्या मुलाने आरामात रहावे अशी ही सर्व पालकांची इच्छा आहे.

कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. सध्यपरिस्थितीमध्ये कंगनाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी कंगनाच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यामुळे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. कंगनाला केंद्राने Y सुरक्षा दिली आहे. कंगनाने ट्विट करून अमित शहांचे आभार मानले आहेत.


हे ही वाचा – मुंबईचा अवमान करणाऱ्या ‘त्या’ उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात आवाज उठवा


First Published on: September 7, 2020 11:13 AM
Exit mobile version