आता नाट्यगृह स्वस्तात उपलब्ध होणार, इतके असणार भाडे

आता नाट्यगृह स्वस्तात उपलब्ध होणार, इतके असणार भाडे

संग्रहित छायाचित्र

कोरोना काळ सुरू झाल्यापासून जवळपास सहा महिने नाट्यगृह बंद होती. यामुळे नाट्यगृह मालकांना वेगवेगळया समस्या, अडचणींना सामोरे जावे लागले. पण अखेर १५ ऑक्टोबरला कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ५० टक्क्यांच्या क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली. तरी देखील नाट्य व्यवसायिकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. कारण ५० टक्के क्षमता असल्यामुळे भाडे परवडत नसल्याने भाडे कमी करण्याची मागणी नाट्य व्यावसायिक करू लागले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने नाट्य व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. सवलतीच्या दरात नाट्यगृह भाड्याने देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच ही सवलत मार्च २०२१ पर्यंत असणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पण कोरोना काळ संपेपर्यंत बालनाट्य बंदच राहणार आहेत.

इतके असणार नाट्यगृहाचे भाडे

पूर्वी मराठी नाटकांसाठी १९ हजार ८५० भाडे होते. पण आता ५ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच अमराठी नाटकांकरता ३९,६९० ऐवजी १० हजार रुपये भाडे घेतले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे नाटकाचे तिकीट ४०० रुपयांपर्यंत असणार आहे. कोरोना काळ संपुष्टात येईपर्यंत बालनाट्य सुरू न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याबाबत आज सविस्तर महापौर किशोर पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.


हेही वाचा – ज्याला मॅसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार – राजेश टोपे


 

First Published on: December 17, 2020 7:10 PM
Exit mobile version