‘दृश्यम 2’ ओटीटीवर झाला प्रदर्शित; पाहण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

‘दृश्यम 2’ ओटीटीवर झाला प्रदर्शित; पाहण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मुख्य भूमिका असणारा ‘दृश्यम 2’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 42 दिवस झाले असून अजूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे धाव घेत होते. दरम्यान, आता हा चित्रपट येत्या काही दिवसात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

‘दृश्यम 2’ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
अजय देवगणचा ‘दृश्यम 2’आता ओटीटीवर देखील पाहता येणार आहे. अमॅझोन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. त्यासाठी प्राईम मेंबरशिप व्यतिरिक्त तुम्हाला 199 रुपये अधिक भरावे लागणार आहेत.

‘दृश्यम 2’ने जगभरातून केला 300 कोटींचा टप्पा पार
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील ‘दृश्यम 2’ने करोडोंची कमाई केली होती. सोमवारी या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 297.50 कोटी झाली आहे. तर भारतातील बॉक्स ऑफिसवर 247.50 ची एकूण कमाई करण्यात आली आहे.

‘दृश्यम’ ने देखील जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती.

 


हेही वाचा :

जान्हवी कपूर करतेय महाराष्ट्राच्या माझी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट; अंबानींच्या पार्टीत दोघंही एकत्र

First Published on: December 31, 2022 3:50 PM
Exit mobile version