‘या’ कारणामुळे पुढे करण्यात आली जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ची रिलीज डेट

‘या’ कारणामुळे पुढे करण्यात आली जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ची रिलीज डेट

नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटद्वारा निर्मित, नितेश तिवारीद्वारा दिग्दर्शित आणि वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बवाल’ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. अशातच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे की व्हीएफएक्स (VFX) आणि टेक्निकल आवश्यकतांमुळे सिनेमाच्या रिलीजमध्ये डिले होऊ शकतो. तसेच, पोलंडमध्ये विशेष टेक्नोलॉजी वापरून या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून, निर्माते एक महत्त्वाकांक्षी ऑनस्क्रीन सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, “या सीक्‍वेन्सवर आम्हाला जसे व्हिज्युअल परफेक्शन मिळवायचे आहे, त्यासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे. आमचे बेस्ट व्हर्जन दर्शकांसमोर सादर करणे हे आमचे ध्येय असल्याने आम्ही कोणत्याही गोष्टीशी तडजोड करू इच्छित नाही.”

अशातच, नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी ‘बवाल’ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.


हेही वाचा :

‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’, अपघातानंतर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ट्विटरवर केला संताप व्यक्त

First Published on: February 3, 2023 3:06 PM
Exit mobile version