Durga Puja Special: ‘ही’ अभिनेत्री आइस्क्रीम खाऊन सोडते उपवास

Durga Puja Special: ‘ही’ अभिनेत्री आइस्क्रीम खाऊन सोडते उपवास

Durga Puja Special: 'ही' अभिनेत्री आइस्क्रीम खाऊन सोडते उपवास

पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवात देवीच्या पुजनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील नवरात्रोत्सवातील दुर्गा पूजा जगभरात प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्येही अनेक कलाकार दरवर्षी दुर्गा पूजेचा आनंद घेत असतात. मात्र अनेक कलाकारांना मुंबईत असल्याने दुर्गा पुजेसाठी आपल्या मुळ गावी जाते आलेलं नाही. त्यामुळे घराची आठवण काढत यंदा मुंबईत दुर्गा पुजा साजरी करत आहेत. यामध्ये अभिनेत्री सायंतनी घोषचाही समावेश आहे. सायंतनीने यंदाच्या दुर्गा पुजा आणि नवरात्रोत्सवातील उत्साह आणि तयारीसंदर्भात माहिती एका टीव्ही चॅनलला दिली आहे.

यावेळी बोलताना सायंतनीने दुर्गा पुजेनिमित्ताने घरीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ‘बंगाली असल्यामुळे दुर्गा पुजा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येक बंगाली व्यक्तीचं स्वप्न असतं की दुर्गापुजेसाठी आपल्या मुळ गावी जावं. मात्र अनेकदा कामामुळे आणि गेल्या २ वर्षांपासून करोना संसर्गामुळे दुर्गा पुजेला घरी जाता आले आले नाही.’ असं सायंतनी म्हणाली.

कोलकत्तामधील नवरात्रोत्सवातील दुर्गा पुजेबाबत सायंतनी पुढे सांगते की, ‘कोलकाता कोलकाता आहे, तिथल्या दुर्गा पुजेची सर कुठेच नाही. मुंबईत राहून हे सगळं खूप मिस करते. तिथे कुटुंबीय आणि मित्रांसोबत उत्सव साजरे करण्याची मजा काही औरचं असते. वेगवेगळ्या पंडालमध्ये जाऊन पुष्पांजली देण्याचा दरम्यान खरेदीचा उत्साह, आनंद वेगळाच असतो. दुर्गा पुजा हा एकमेव सण असायचा जेव्हा रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहण्याची परवानगी मिळायची. अष्टमीच्या दिवशी सर्व मित्रमंडळी आम्ही खूप फिरायचो आणि स्ट्रीट फूडची मज्जा घ्यायचो.’

यावेळी तिने आजोबांसोबतच्या दुर्गा पुजेच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ‘दुर्गा पुजेदरम्यान आम्ही आजोबांसोबत फिरायला जायचो. यावेळी आमचा उपवास असायचा. त्यामुळे आजोबा आम्हाला पुष्पांजली देऊन फिरायला न्यायचे. तेव्हा मी आईसक्रिम खाऊन उपवास तोडायचे, असं सायंतनीने सांगितलं. आईसक्रिम खाऊन उपवास तोडायचा हा ट्रेंड आम्ही नेहमी फॉलो करायचो. आता आजोबा राहिले नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहे,’ असं सायंतनी म्हणाली.

‘मी गेल्या १६ वर्षांपासून मुंबईत राहतेय. त्यामुळे बऱ्याचदा माझा दुर्गा पुजेसाठी घरी जाण्याचा प्रयत्न असतो. मात्र, कामामुळे गेल्या पाच वर्षांपासून मला दुर्गा पुजेला कोलकात्याला जाता आलं नाही, मात्र मुंबईत असले तरी अष्टमीच्या दिवशी मी सुट्टी घेते, साडी नेसते आणि दुर्जापुजेच्या पंडालला भेट देते. ओळखीच्या बंगाली अभिनेत्री आणि मैत्रिणींसोबत दुर्गा पुजा साजरी करते,’ असं सायंतनी म्हणाली.


First Published on: October 10, 2021 5:44 PM
Exit mobile version