Dybbuk Teaser: इमरान हाशमीचा हॉरर-थ्रिलर ‘दिब्बुक’चा टीजर रिलीज

Dybbuk Teaser: इमरान हाशमीचा हॉरर-थ्रिलर ‘दिब्बुक’चा टीजर रिलीज

Dybbuk Teaser: इमरान हाशमीचा हॉरर-थ्रिलर 'दिब्बुक'चा टीजर रिलीज

इमरान हाशमीचा बहुप्रतिक्षित हॉरर-थ्रिलर चित्रपट ‘दिब्बुक-द कर्स इज रियल’ सिनेमाचा रोमांचक टीजर नुकतेच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात इमरान हाशमी आणि निकिता दत्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती पैनोरमा स्टूडियोज आणि टी-सीरीज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या चित्रपटातून इमरान हाशमी डिजिटल सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. हा सिनेना २९ ऑक्टोबर २०२१ ला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

जय यांच्याद्वारे लिखित आणि दिग्दर्शित हा आगामी अमेझॉन ओरिजिनल चित्रपट २०१७मध्ये आलेल्या मल्याळम ब्लॉकबस्टर चित्रपट – ईजराचा अधिकृत रीमेक आहे ज्याला क्लिंटन सेरेजो यांनी संगीत दिले आहे.

हैलोवीनच्या स्पिरिटला जिवंत करत, टीजरने निश्चितपणे अंगावर काटा आणला आहे. इमरानसोबत, जो पुन्हा एकदा आपल्या पसंतीच्या हॉरर जॉनरमध्ये एंट्री घेत आहे, या चित्रपटात निकिता दत्ता आणि मानव कौलदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. भीतीदायक टीजरमध्ये निकिता आपल्या व्यक्तिरेखेद्वारे दिब्बुक बॉक्स उघडते, ज्याच्या चारही बाजूला ट्रबल लिहिलेले आहे आणि त्यानंतर जे काही होते ती भयावह घटनांची मालिका आहे आणि दर्शकांचे अंगावर सरसरून काटा आणेल. त्यामुळे प्रेक्षकांनी आता इमरानचा सुपरनॅचरल थ्रिलरपट पाहण्यासाठी सज्ज व्हा.


डॉक्टरांनी मूतखड्याऐवजी काढली चक्क रुग्णाची किडनी, ११ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश


 

First Published on: October 19, 2021 3:31 PM
Exit mobile version