अनिता हसनंदानीनं दिली गुडन्यूज, एकताने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

अनिता हसनंदानीनं दिली गुडन्यूज, एकताने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

अनिता हसनंदानीनं दिली गुडन्यूज, एकताने अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारीला तिला पुत्रप्राप्ती झाली आहे. अनिताचा नवरा रोहित रेड्डीने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या आनंदाच्या बातमी निमित्ताने अनिताच्या चाहत्यांनी आणि टिव्ही इंडस्ट्रीमधील मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. यादरम्यान निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर अनिता आणि तिच्या बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली आहे.

एकता कपूरने बेडवर झोपलेल्या अनितासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनिता खूप आनंदी दिसत आहे आणि विक्ट्री साईन दाखवत आहे. एकता कपूर या व्हिडिओत अनिताचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो काढत आहे. अनिता एकता शुभेच्छा देताना म्हणत आहे की, ‘मला भाचा झाला आहे.’ एकता कपूरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘जेव्हा आपल्याला असे वाटते की, आपण काम आणि लव्हलाईफबाबत बोलू शकत नाही, पण आता बेबीबाबत चर्चा होईल.’


हेही वाचा – बेबो गेली बाळाचे चेकअप करायला अन् फोटो झाले व्हायरल


 

First Published on: February 10, 2021 4:31 PM
Exit mobile version