Video: …म्हणून ‘या’ अभिनेत्रीने मनोज वाजपेयीची काढली मिशी!

Video: …म्हणून ‘या’ अभिनेत्रीने मनोज वाजपेयीची काढली मिशी!

अभिनेता मनोज बाजपेयी

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री व ‘बिग बॉस सीझन ७’ची स्पर्धेक एली अवराम या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एली अवराम ही मनोज वाजपेयीची मिशी काढताना दिसत आहे. एलीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडिओ चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने असं लिहिलं की, एका उत्साही लहान मुलासारखे मी या क्षणासाठी थांबले होते. हा व्हिडिओ दोघांच्याही चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये एली लाल रंगाची साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

प्रसिध्द रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन ७’ मध्ये अभिनेत्री एली अवराम दिसली होती. त्यानंतर तिने २०१३ मध्ये बॉलिवूड मध्ये मनीष पॉल सोबत ‘मिक्की वायरस’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. लवकरच ती अनिल कपूर आणि दिशा पटानीसोबत ‘मलंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तसंच अभिनेता मनोज वाजपेयी सोबत ती ‘मुंबई सागा’ या चित्रपटातून दिसणार आहे.


हेही वाचा – अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचे ‘साकीसाकी’वर ठुमके; व्हिडीओ व्हायरल


 

First Published on: November 20, 2019 12:35 PM
Exit mobile version