‘मीसुद्धा घराणेशाहीच्या राजकारणाला बळी पडलो होतो’; सैफने सांगितला हा अनुभव

‘मीसुद्धा घराणेशाहीच्या राजकारणाला बळी पडलो होतो’; सैफने सांगितला हा अनुभव

सैफ अली खान

बॉलीवूडमध्ये सध्या घराणेशाहीचा वाद चांगलाच उफाळला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सेलिब्रिटींसह अनेकांनी नेपोटिझमच्या विषयावर सोशल मीडियामध्ये आपले मत व्यक्त केले आहे. आता बॉलीवूडचे मोठमोठ कलाकारही यासंबंधी बोलू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिने घराणेशाहीच्या राजकारणाला आपल्यालाही तोंड द्यावे लागले असल्याचे म्हटले होते. तर आता अभिनेता सैफ अली खान यांनी आपणही या प्रथेला बळी पडलो असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी त्याची दखल कोणीही घेतली नाही, याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सैफने सांगितले की, ‘कॉफी विथ करण या शोमध्ये कंगना काय बोलत होती ते मला माहित नाही. करण जोहरबद्दल म्हणायचे झाल्यास, त्याने स्वत:ला इतके मोठे बनवले आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. सत्य हे नेहमी गुंतागुंतीचे असते. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. मला आशा आहे की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील. भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. मीसुद्धा घराणेशाहीचा शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही.’

शुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यामुळे करण जोहर, सलमान खान, आलिया भट यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा –

बेस्ट सुसाट; मिळवला एका दिवसात ८३ लाखांहून अधिक महसूल

First Published on: July 2, 2020 10:07 AM
Exit mobile version