अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ तेलगू चित्रपट आता हिंदीत

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ तेलगू चित्रपट आता हिंदीत

अमिताभ बच्चन यांचा 'हा' तेलगू चित्रपट आता हिंदीत

मेगास्टार चिरंजीवी यांच्या ‘सै रा नरसिंह रेड्डी’ ऐतिहासिक चित्रपटाच्या हिंदी प्रदर्शनासाठी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्म्सने पुढाकार घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा एक्सेल एंटरटेन्मेंटने ट्विटर द्वारे केली आहे. फरहान अख्तर यांनी घेतलेल्या निर्णयाचे कोनिडेला निर्मिती संस्थेने स्वागत केले आहे. २०१८ साली सिने-रसिकांचे लक्ष वेधून घेतलेल्या अभिनेते यश यांच्या केजीएफ म्हणजेच कोलार गोल्ड फिल्डस् या चित्रपटाच्या हिंदी प्रदर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्म्सने घेतली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

चित्रपटात होते ‘हे’ दिग्गज कलाकार

‘सै रा’ हा मेगास्टार चिरंजीवी यांचा १५१ वा चित्रपट होता. या ऐतिहासिक चित्रपटात खुद्द अभिताभ बच्चन यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या भव्य चित्रपाटात तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे. चिरंजीवी, अभिताभ बच्चन यांच्या शिवाय या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, किच्चा सुदीप, विजय सेतुपती, जगपती बाबु, तमन्ना भाटिया सहित अनेक मोठमोठे कलाकार सामिल आहेत.

चित्रपटात साकरला आहे नरसिंह रेड्डींचा जीवनपट

‘सै रा नरसिंह रेड्डी’ हा चित्रपट महान क्रांतिकारी उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. नरसिंह रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला होता. विशेष म्हणजे १८५७च्या उठवा पूर्वीच नरसिंह रेड्डी यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते.


हेही वाचा – जाणून घ्या, नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून कसे घडले?

First Published on: August 14, 2019 2:36 PM
Exit mobile version