फेसबुक वाला प्यार

फेसबुक वाला प्यार

Facebook wala Paayaar

काळ झपाट्याने बदलतो आहे. त्याची नोंद कुठे, कशी असेल हे सांगता येणे कठीण आहे. पण हिंदी, मराठी चित्रपटांनी तांत्रिकदृष्ट्या होणार्या बदलांचा ज्यांचा माणसाशी संबंध आहे अशा गोष्टी गाण्यातून, कथेतून चित्रपटात येतील असे त्या त्या काळातील दिग्दर्शकांनी पाहिलेले आहे. टेलिफोन, पेजर, मोबाईल याचे सर्रास दर्शन चित्रपटातून घडलेले आहे. ‘व्हाट्सअँप लव’ हा मराठी चित्रपट येतो आहे आणि आता फेसबुकचीही यातून सुटका झालेली नाही. नारायण के शाहू याने टिकू कुरेशी या निर्मात्याच्या सहकार्याने ‘फेसबुक वाला प्यार’ हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. व्हॅलेंटाईनचे निमित्त घेऊन तो प्रदर्शित करण्याचे ठरवले गेलेले आहे.

फेसबुकचा वापर हा युवावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. रोजच्या जीवनात ज्या चांगल्या घडामोडी घडतात त्या या फेसबुकच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवल्या जातात. ओळखीच्या व्यक्तींबरोबर अनोळखी व्यक्तीही नकळतपणे यात जोडले जातात. संवाद साधला जातो. मैत्री निर्माण होते आणि कधीतरी प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता निर्माण होते. यात चांगली भावना जशी असते तशीच फसवण्याची वृत्ती असलेले व्यक्तीही या माध्यमाचा गैरफायदा घेताना दिसतात. दिग्दर्शकाने यातल्या प्रेमाला या कथेत अधोरेखीत केले असले तरी फेसबुकचा मानवी मनावर होणारा परिणाम दाखवण्याचा प्रयत्नही यात होणार आहे. राहुल बग्गा आणि नॅन्सी ठक्कर ही जोडी आपल्या प्रेमाचा अविष्कार यात दाखवणार आहे.

First Published on: February 12, 2019 4:47 AM
Exit mobile version