लोकगीतकार सुनील सकट यांचे निधन

लोकगीतकार सुनील सकट यांचे निधन

लोकगीतकार सुनील सकट यांचे निधन

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले ‘इलू इलू’ (Illu Illu )  या गाण्याचे कवी प्रसिद्ध लोकगीतकार सुनील सकट यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ( Folklorist Sunil Sakat passes away ) वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येतोय. लोकगीतावर त्यांची विशेष पकड होती. आजवर अनेक लोकगीते त्यांनी लिहिली. सुरेश वाडकर (Suresh Wadkar)  वैशाली सामंत ( Vaishali Samant )  प्रल्हाश शिंदे ( Pralhash Shinde) आनंद शिंदे ( Anand Shinde)  मिलिंद शिंदे (Milind Shinde ) आदर्श शिंदे ((Adarsh Shinde )  यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी सुनील सकट याच्या गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांचे अलिकडेच रिलीज झालेले इलू इलू हे गाणे तूफान गाजले होते. या गाण्याला आजवर 2 मिलीयन्सहून अधिक व्यूज मिळालेत.

सुनिट सकट हे उत्तर गीतकार होतेच त्याचप्रमाणे हे उत्तम ढोलकी वादकही होते. लहानपाणापासून कलेची आवड असल्याने सुरुवातीला त्यांनी ढोलकी वाजवण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना गीत लेखनाची आवड निर्माण झाली. आजवर त्यांनी गीते लिहिली त्यातील बाबूराव, शूरविरांची तलवार, एकच नंबर ही गीते विशेष गाजली.

सुनीट सकट यांच्या निधनाने कलाविश्वास मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून एक श्रद्धांजली गीत देखील तयार करण्यात आले आहे. त्याला ‘का र दडवलं’ असे ते गाणे आहे. गीतकार साईनाथ पाटोळे यांनी हे गाण लिहून सुनील सकट यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर संदिप योगेश यांनी गाण्याला संगीत दिले असून रोमियो कांबळे यांनी हे गाणे गायले आहे. गेली अनेक वर्ष सुनिल सकट यांनी लोकगीतांमध्ये आपले बहुमोल योगदान दिले आहे. आजही त्यांच्या गाण्याची सर्वत्र चर्चा असून त्यांचे अकाली जाणे हे सर्वांसाठी चटका लावणारे आहे.


हेही वाचा – Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराजांचे निधन,वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

First Published on: January 17, 2022 9:39 AM
Exit mobile version