घरताज्या घडामोडीBirju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराजांचे निधन,वयाच्या 83व्या वर्षी...

Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराजांचे निधन,वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

बिरजू महाराजांनी गेली अनेक वर्ष शास्त्रीय नृत्यात विशेष: कथ्थक नृत्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. लखनऊ घराची विशेषता त्यांनी त्यांच्या नृत्यातून आजवर जपली. त्यांच्या जाण्याने शास्रीय नृत्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध कथ्थक नर्तनकार पंडीत बिरजू महाराज यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ( pandit birju maharaj passed away)  रविवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. दिल्लीतील साकेत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बिरजू महाराजांनी गेली अनेक वर्ष शास्त्रीय नृत्यात विशेष: कथ्थक नृत्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. लखनऊ घराची विशेषता त्यांनी त्यांच्या नृत्यातून आजवर जपली. त्यांच्या जाण्याने शास्रीय नृत्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक प्रसिद्ध शास्रीय नृत्य कलाकारांनी महाराजांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.

पंडीत बिरजू महाराजांवर मागील महिन्याभरापासून उपचार सुरू होते. रविवारी रात्री 12:15 ते 12:30 वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुढील 10 मिनिटात त्यांना दिल्लीच्या साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती बिरजू महारांची नात प्रसिद्ध कथ्थक वादक रागिणी महाराज यांनी दिली.

- Advertisement -


बिरजू महाराज गेले अनेक वर्ष दिल्लीतील कलाश्रम (kalashram )  या त्यांच्या संस्थेमार्फत कथ्थक नृत्याचे शिक्षण देत होते. देश विदेशातून नृत्यकार त्यांच्या कथ्थक नृत्याने धडे घेण्यासाठी येत असत. अभिनेत्री आणि नर्तिका शाश्वती सेन या महाराजांच्या छत्रछायेत राहून कलाश्रमची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.

- Advertisement -

वडीलांकडून मिळाले नृत्याचे बाळकडू

शास्रीय नृत्य प्रकारातील कथ्थक या नृत्य प्रकारात प्राविण्य मिळवणाऱ्या बिरजू महाराजांच्या जन्म 4 फेब्रुवारी 1938 साली लखनऊ येथे झाला. त्यांचे मुळ नाव पंडीत ब्रिजमोहन मिश्र असे आहे. त्यांच्या वडिलांकडून लहान पणापासूनच कथ्थक नृत्याचे बाळकडू मिळाले. बिरजू महाराज हे केवळ उत्तम नर्तक नाही तर उत्तम शास्त्रीय गायकही होते. त्यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज आणि काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार होते. वडील आणि काकांच्या छत्रछायेत बिरजू महाराज लहानाचे मोठे झाले आणि तिथेच ते एक सर्वोत्तम कथ्थक नृत्यकार म्हणून घडले.

अनेक बॉलिवूड सिनेमात नृत्य दिग्दर्शन

पंडीत बिरजू महाराजांनी आजवर अनेक शिष्य घडवले. आज देशात तसेच देशाबाहेरही बिरजू महाराजांचे शिष्य त्यांची कला जोपासत असून लखनऊ घराण्याची विशेषत: जपण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडमध्ये देखील अनेक अभिनेत्रींनी बिरजू महाराजांकडे नृत्याचे धडे घेतले. अभिनेत्री शास्वती सेन (Shashvati sen) तसेच माधूरी दिक्षित (Madhuri Dixit )  दीपिका पादुकोन (deepika Padukon )  यांसारख्या कलाकारांनी पंडीत बिरजू महाराजांकडे नृत्याचे शिक्षण घेतले.त्याचप्रमाणे देवदास, डेढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यासारख्या प्रसिद्ध सिनेमात महाराजांचे नृत्यदिग्दर्शन पहायला मिळते. सत्यजीत राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमाला देखील महाराजांनी म्युझिक दिले होते.

अनेक पुरस्कारांनी गौरव 

बिरजू महाराजांना त्यांच्या कथ्थक नृत्यातील योगदानासाठी 1983 मध्ये ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘संगीत नाटक अकादमी ‘आणि ‘कालिदास’ पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आले. ‘काशी हिंदू विश्वविद्याल’ आणि ‘खैरागड विश्वविद्यालयातून’ बिरजू महाराजांनी डॉक्टरेट ही पदवी संपादित केली. 2012मध्ये ‘विश्वरुपम’ सिनेमासाठी नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर 2016 मध्ये आलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 


हेही वाचा –  Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -