शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?,सुनंदा शेट्टीला नेटकऱ्याने केला सवाल

शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?,सुनंदा शेट्टीला नेटकऱ्याने केला सवाल

शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?,सुनंदा शेट्टीला नेटकऱ्याने केला सवाल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची(Shilpa Shetty) आई सुनंदा शेट्टी(sunanda shetty) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते(social media). नुकतचं त्यांनी इंस्टाग्राम अकांऊटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी एक सुंदर साडी परिधान केली असून बिग बॉस ओटीटीच्या(Bigg Boss OTT) घरात शमिता शेट्टीच्या भेटीला आली असतांना त्यांनी हा अत्यंत सुंदर असा फोटो काढला होता. यानंतर सोशल मीडियावर सध्या सुनंदा शेट्टी यांच्या या फोटची जोरदार चर्चा रंगत असून या फोटोवर एका यूजरने केलेल्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.(Fan asks Sunanda Shetty ‘are Shilpa Shetty and Shamita Shetty your sisters?’)

काही दिवसांपूर्वी सुनंदा शेट्टी यांनी एक सुंदर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहलं होतं की, बिग बॉसच्या घरी आले आहे. माझ्या लेकीला म्हणजेच शमिताला जवळपास एका महिन्यानी भेटत आहे. यानंतर एका नेटकऱ्याने सुनंदा यांना कमेंट करत सवाल केला की, शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?, यावर सुनंदा यांनी अगदी स्पष्टपणे उत्तर देत म्हणाल्या की, नाही, त्या दोन्ही माझ्या मुली आहेत. सध्या सगळीकडे सुनंदा शेट्टी यांना नेटकऱ्याने केलेल्या या अतरंगी प्रश्नाची चर्चा रंगत आहे.

सुनंदा शेट्टी यांना नेहमी बॉलिवूडम मधील पार्टी ,इव्हेंट, अवॉर्ड सोहळ्या दरम्यान स्पॉट करण्यात येते. बिग बॉसच्या घरात आपल्या लेकीला भेटीला गेली असता त्यांचे डोळे काहीसे पानावले होते. तसेच शमिता आणि राकेशची जोडी त्यांना प्रचंड आवडली आहे. असे वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं.


हे हि वाचा – Siima Award 2021 रश्मिकाला मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा अवॉर्ड तर महेश बाबू ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

First Published on: September 19, 2021 3:55 PM
Exit mobile version