Amazon Prime च्या मेंबरशीपसाठी मागितली मदत; सोनू सूदने दिलं भन्नाट उत्तर

Amazon Prime च्या मेंबरशीपसाठी मागितली मदत; सोनू सूदने दिलं भन्नाट उत्तर

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. सोनू सूद सोशल मीडियावर सक्रीय असून अजूनही तो लोकांना मदत करत आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. अजूनही काही जण सोनू सूदकडे मदत मागत असतात. या दरम्यान, काहीजण सोनूकडे इतर वैयक्तिक आणि मजेशीर मदतही मागत असल्याचे दिसून येत आहे.

एका पठ्याने ट्विटरद्वारे सोनू सूदकडे एक अनोखी आणि मजेशीर मागणी केली आहे. एकाने ट्विट करत Amazon Prime च्या मेंबरशीपसाठी मदत मागितली आहे. “सोनू सूद भावा, मला Amazon Prime च्या १ वर्षाच्या मेंबरशीपसाठी मदत कर ना. मी व्ही मूव्हीची वाट पाहतोय,” असे ट्विट केले आहे. चाहत्याच्या या ट्विटला प्रतिसाद देत सानूने देखील मजेशीर उत्तर दिले आहे. “मेंबरशीपसोबत मी तुला टीव्ही, एसी आणि पॉपकोर्न पण पाठवू का?,” असे मजेशीर उत्तर दिले आहे. सोनू सूदचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

अजून एकाने भन्नाट मागणी केली होती. “भाई, मला कुठे तरी सोड. मला गर्लफ्रेंडसोबत पळून जायचंय. तो अंदमान किंवा निकोबारला तरी सोड,” अशी मागणी केली होती. यावर माझ्याकडे यापेक्षा चांगली कल्पना आहे. तुमच्यासोबत मी तुमच्या कुटुंबियांना देखील पाठवू का? लागलीच लग्न देखील होऊन जाईल, असे भन्नाट उत्तर सोनू सूदने दिले होते.

First Published on: August 28, 2020 11:58 PM
Exit mobile version